
शिर्डी येथील ठकसेन सावळे कुटुंबियांनी हजारो लोकांना करोडोचा रुपयांचा गंडा घातला हे पैशे मिळणार नाहीत ह्याने गुंतवणूक धारकांना चुना लावला आहे म्हणून त्यावर गुन्हे दाखल करा हे दैनिक साई दर्शन ने सर्वप्रथम सांगितले आणि गुंतवणूक धारकांची फसवणूक झालेली आहे
हे हि सांगितले असता काही गुंतवणूकदार हे प्रचंड मोहमायात व्यापलेले होते त्यांना वाटायचे कि आपले पैशे मिळतीलच परंतु हाती आली निराशा आणि काही गुतंवणूकधारकांचा सय्यमचा बाण सुटला तेव्हा सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे ह्या ठकसेन भुप्या सावळे वर गुन्हा दाखल झाला त्यास अजमेर येथून स्थानिक शाखेने अटक केली
त्यानंतर हा भुप्या आणि त्याला साथ देणारे त्याच्या सहकाऱ्यांवर राहाता पोलीस स्टेशनला दुसरा गुन्हा दाखल झाला पुन्हा शिर्डीत तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला यातील भुप्या पाटील ला सोडले तर बाकी सर्व आरोपी फरार आहेत परंतु कानून के हात लांबे होते है तशेच ह्या फरार आरोपींना देखील पोलीस अटक करणार यात काहीही शंका नाही
परंतु ह्यादरम्यान सर्वात महत्वाची बाब उघडकीस आली ती म्हणजे जे संस्थान कर्मचारी आहेत ज्यांना १०००० ते चाळीस हजार पगार आहे त्यांच्याकडे लाखो कुठून आलेत याचाही तपास पोलिसांनी लावणे महत्वाचे आहे कारण मिळणाऱ्या पगारातून घर चालवणे सोपे नसतांना यांनी लाखो रुपये गुंतवलेले आहेत याचीही शहानिशा व्हावी
असे जागृत नागरिकांचे मत आहे म्हणून ह्या गुंतवणूक धारकांच्या पैश्यांची आवक कुठून होत होती याचा तपास पोलिसांनी लावावा व उर्वरित गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे