शिर्डीच्या राजकारणात आज सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकलाय —
“शिर्डीला लुटणाऱ्यांना पुन्हा संधी का?”
ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी एका तडाखेबाज विधानातून गेल्या २५ वर्षांच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत मतदारांना सावधान केले आहे.
२००१ पासून सुरू झालेला लुटारूंचा काळाचक्र
२००१ साली नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता शिर्डीत आली.
परंतु त्या सत्तेचा दुरुपयोग करून टोलनाक्याचे ठेके, ५३ आरक्षणांवर डल्ला, ठरावांची रद्दबातल…
या सर्व भ्रष्ट कामातून कोट्यवधी रुपये शिर्डीतून बाहेर गेले.
सत्ता मिळाली की पैसा
आणि पैशातून पुन्हा सत्ता —
याच योजनेने काही मंडळी २५ वर्षे रंगलेली!
आज हीच मंडळी वेगवेगळे केस पांढरे–काळे करून पुन्हा “विश्वासू उमेदवार” म्हणून मतदारांवर लादले जात आहेत.
गद्दारी, स्वार्थ आणि राजकीय पॉलिश — सर्व काही उघड!
ज्यांनी साईबाबांची झोळी रिकामी केली…
ज्यांनी राधाकृष्ण विखेंची पाठीत खंजीर खुपसली…
तेच लोक आज डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाने वोट मागायला उभे!
अहो, ज्यांनी खासदार–आमदारांना देखील सोडलं नाही, त्यांना साधा मतदार काय भावणार?
शिर्डीमध्ये लूट करणारा “पॉलिशवाला” आजही पुढाऱ्यांच्या वेषात उभा.
मुख्याधिकार्यांसह अय्याश्या! मंचावर नाव घेऊन कबुली!!
याच मंडळींतील एक उमेदवार तत्कालीन मुख्याधिकारी सोबत
नाशिक, मुंबई, लोणावळा येथे मौजमजा करत होता —
हे फक्त आरोप नाहीत,
तर शिर्डीतील एका नेत्याने सार्वजनिक सभेत नाव घेऊन कबूल केलेली गोष्ट!
सात खून, तडीपार गुन्हेगारांचे आश्रय, पासेसचा काळाबाजार…
शिर्डीत गेल्या पाच वर्षांत घडलेले काळेकुट्ट अध्याय:
७ निष्पाप लोकांचे खून
तडीपार सराईत गुन्हेगारांना आश्रय
साई संस्थानातील चोरी
व्हीआयपी पासेसचा काळाबाजार
बनावट देणगी पावत्या
वर्षानुवर्ष एकाच जागी बसलेले भ्रष्ट अधिकारी–कर्मचारी
भाविकांकडून लाखो रुपयांची लूट
या प्रत्येक प्रकरणात राजेंद्र भुजबळ यांनी निर्भीडपणे आवाज उठवला —
तोही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत.
“मी पत्रकारच नाही… साई संस्थानचा चौकीदारही आहे!” — राजेंद्र भुजबळ
“शिर्डीत चुकीचं काम करणाऱ्याला मी कधीही सोडणार नाही.
सत्ता येईल–जाईल, पण मी सत्यासाठी लढत राहणार.”
असा निर्धार व्यक्त करत भुजबळ म्हणाले—
“राजकारण माझा पिंड नाही.
मला हवाय — स्वच्छ शिर्डी! सुंदर शिर्डी!! सुरक्षित शिर्डी!!!
रामराज्य हवे आहे… गुंडाराज नव्हे!”
“माझ्याकडे गमविण्यासाठी काही नाही! पण मी टांगा पलटी करू शकतो!!”
मतदारांनी प्रामाणिक पत्रकाराकडे दुर्लक्ष केलं तरी त्याला काही फरक नाही.
परंतु —
“माझ्या लिखाणात आजही अशी ताकद आहे
की मी राजकारणातील संपूर्ण टांगा पलटी करू शकतो.”
हा दमदार इशारा देत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी
शिर्डीतील मतदारांना जागे होण्याचे आवाहन केले आहे.
