Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
क्राईमशिर्डी

गुंतवणूकदाराचे कष्टाचे पैशे घेऊन फरार झालेल्या भूपेंद्र पाटीलवर गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील अनेक लोकांना चुना लावणारा भूपेंद्र साळवे पाटील वर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील लोकांना फसविल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे  तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे कि  नोव्हे. 2024 मध्ये नाशिक येथे ग्रेप काऊंटी रिसॉर्ट येथे ग्रो मोअर इनवेस्टमेंट कपंनी या नावाने व्यवसाय करणा-या भुपेंद्र साळवे पाटील, रा. खुटवड नगर, नाशिक हा नाशिक येथील ऑफिसचा पत्ता आहे भूपेंद्र हा राहाणार मूळ शिर्डीचा आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भूपेंद्र याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात माझ्या  पतीची त्याचेशी ओळख झाली. त्यावेळी त्याने माझ्या पतीस शेअर मार्केट संदर्भात गुतंवणुक प्लॅन सुचविले. आमच्या इतर नातेवाईकांनी पण त्याचेकडे शेअर मार्केट मध्ये गुतंवणुक केल्याने माझ्या पतीचा त्याचेवर विश्वास बसला. त्यानंतर त्याने माझ्या पतीचे मित्र अरुण नंदन यांना मध्यस्थी करुन टेलीग्राम ग्रुपवर गुंतवणुक प्लॅन शेअर केले. भुपेंद्र साळवे पाटील याने शेअर मार्केट संबंधीत विविध गुतंवणुक योजना माझे पती समोर सादर केल्या. ग्रो मोअर इनवेस्टमेंट कपंनी चे ऑफिस नाशिक येथे खुटवड नगर येथे एका फलॅट मध्ये आहे.


त्यातील शिवमनी स्किम मध्ये माझ्या पतीने भुपेंद्र साळवे पाटील याचेवर विश्वास ठेवुन दि. 20/12/2024 रोजी 2,00,000/- रुपये रक्कम त्यांच्या ICICI बैंक शाखा, पाथर्डी फाटा, नाशिक येथुन AC.NO. 99977777077707 HDFC बँक शाखा शिर्डी, नाशिक (ग्रो मोअर इनवेस्टमेंट कपंनी) आर.टी.जी.एस केली. 8 महिन्यात रक्कम दुप्पट होईल असे भुपेंद्र साळवे पाटील याने माझ्‌या पतीस सांगीतले.

त्यानंतर मी स्वता 12 महिन्यांची मासिक व्याज योजनेत दि. 23/12/2024 रोजी 6,00,000/- रु. गुंतवले. ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला 72,000/- रुपये व्याज मिळेल आणि 12 महिन्यानंतर मुळ रक्कम परत मिळेल असा करार झाला. तो देखील माझेकडे आहे. मला पोस्ट डेटेड चेक देखील देण्यात आला होता. तो देखील माझेकडे आहे.

जानेवारी 2025 मध्ये मला पहिल्या महिन्याचे व्याज 72,000/- रुपये मिळाले. परंतु त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मे 2025 चे व्याज मिळालेले नाही. आम्ही भुपेंद्र साळवे पाटील यास त्याचा मो.क्रं. 9049755560 यावर संपर्क साधता त्याचा नंबर हा बंद आढळुन आला. व तो फरार झाल्याचे आम्हास समजले.

माझ्या पतीने मित्र अरुण नंदन यांना त्यांचा मो.क्रं. 7738199909 यावर संपर्क साधता त्याने सांगीतले की, शेअर मार्केट मंदावले आहे थोडे थांबा असे उडवा उडवीचे उत्तरे देवु लागला. आम्हास नंतर समजले की, ग्रो मोअर इनवेस्टमेंट कपंनी या नावाने व्यवसाय करणा-या भुपेंद्र साळवे पाटील याचे कपंनीकडे SEBI चे अॅथोराईज लायसन्स नाही.  ग्रो मोअर इनवेस्टमेंट कपंनी या नावाने व्यवसाय करणा-या भुपेंद्र साळवे पाटील, रा. खुटवड नगर, नाशिक याने

मी, माझे पती  व इतर यांचे देखील एकुण 3 कोटी हुन अधिक रक्कम फसवणुक करुन घेण्यात आलेली आहे. म्हणुन माझी ग्रो मोअर इनवेस्टमेंट कपंनी या नावाने व्यवसाय करणा-या भुपेंद्र साळवे पाटील, रा.खुटवड नगर, नाशिक याचेविरुद्ध फसवणुक केल्याप्रकरणी कायदेशीर तक्रार आहे.आरोपीना आजून अटक करण्यात आलेली नाहीं 


शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी तक्रार दाखल केली आहे अधिक तपास नंदुरबारचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे करीत आहेत ह्या भूपेंद्र पाटील याने संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील लोकांना फसविले आहे नंदुरबार जिल्ह्यात प्रथम गुन्हा दाखल झाल्याने ह्या चांडाळ चौकडी आणि यांना मदत करणाऱ्यांचे धाबे दनावलेले आहेत ह्या भूपेंद्रचे वडील राजाराम पाटील भाऊ संदीप पाटील सुबोध पाटील हेही कलेक्शन करीत असल्याची चर्चा आहे

ह्या चांडाळ चौकडीने अधिक पैश्याचे अमिश दाखवून शिर्डी सह राज्य परराज्यातून शेकडो कोटी रुपये जमा केलेले आहेत नंदुरबार सह शिर्डीत सुद्धा लवकरच गुन्हे दाखल होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे हे प्रकरण सर्वात आधी दैनिक साईदर्शनने उघडकीस आणले व त्याचा पाठपुरावा सुरु केलेला आहे जोपर्यंत ह्या भूपेंद्र आणि याला मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन फसवणूक झालेल्या लोकांना न्याय मिळत नाही

तोपर्यंत दैनिक साईदर्शन पाठपुरावा करीत राहाणार आहे ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना आमच्याकडून काहीही मदत लागल्यास दैनिक साई दर्शन त्यांना मदत करणार आहे वरील दाखल झालेला  गुन्हा रजिस्टर नंबर फसवणूक झालेल्यांचे नावे काही तांत्रिक अर्चनीमुळे जाहीर केले नाही ते पुढील अंकात जाहीर करणार आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button