Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
Blog

साईभक्त तारेश आनंद व शनिशिंगणापूर येथील सिताराम शेटे यांच्या देणगीतून आकर्षक अशी विद्युत रोषणाई

शिर्डी
येथे श्री दत्त जयंती निमित्त अनेक साई पालख्या व हजारो साईभक्त साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. त्यामुळे शिर्डी साई भक्तांनी गजबजून गेली आहे. अनेक साई पालख्या व पदयात्री साई नामाचे भजन गात व साई रथासह शिर्डीत येत असून शिर्डीतील व परिसरातील रस्ते साई भक्तांनी गजबजून गेले आहेत. नगर मनमाड रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलीस मोठे परिश्रम घेत आहे. गर्दी काळात भक्तांची सुरक्षासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी संस्थांनचे सुरक्षा अधिकारी कर्मचारी मोठे प्रयत्नशील आहेत.
श्री साई समाधी मंदिर व परिसरात अमेरिका येथील साईभक्त श्री तारेश आनंद व शनिशिंगणापूर येथील सिताराम शेटे यांच्या देणगीतून आकर्षक अशी विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. रात्री श्री साईंचे समाधी मंदिर व परिसर विविध रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाईने उजाळून निघत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


श्री दत्त जयंती निमित्त येथील लेंडी बागेतील श्री दत्त मंदिर व परिसरातही आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली असून श्री साई समाधी मंदिरा बरोबरच श्री दत्त मंदिराच्या दर्शनासाठीही भक्तांची गर्दी दिसून येत आहे. शिर्डीत मोठ्या संख्येने साईभक्त आल्यामुळे मंदिर व परिसरात तसेच दर्शन रांगेत साईप्रसादालयात , संस्थांनच्या सर्व निवासस्थाने त्याचप्रमाणे शहरातील सर्व हॉटेल लॉज हाऊसफुल झाले आहेत. सर्वत्र साई नामाचा गजर ऐकू येत आहे.
साई संस्थांनने साई भक्तांसाठी गर्दी लक्षात घेऊन विविध ठिकाणी मंडप ,पिण्याचे पाणी, आरोग्य ,दर्शन रांगेत चहा कॉफी ची व्यवस्था करण्यात आली आहे. साई भक्तांना संस्थांनचे लाडू प्रसाद पाकीट मिळावे म्हणून संस्थांनकडुन अतिरिक्त स्टॉल टाकण्यात आले आहेत.

साईप्रसादालातही प्रसाद भोजन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नाताळ सुट्ट्या, श्रीदत्त जयंती, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई भक्तांची अशीच गर्दी अजून काही दिवस राहणार असून संस्थांनतर्फे शिर्डी महोत्सवाची तयारी जोरदार करण्यात आली आहे. 31 डिसेंबर रोजी रात्रभर श्री साई समाधी मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button