Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
क्राईमशिर्डी

shirdi news : उज्जैन येथील साईभक्ताला संस्थान कर्मचाऱ्यांनी घातला 40 लाखाचा गंडा ! संस्थान प्रशासन कारवाई करणार का ?

Sai devotees in Ujjain were given a bribe of 40 lakhs by Sansthan employees! Will the institute administration take action?

24 ऑगस्ट 2024

sai nirman
जाहिरात

साई संस्थांनचा कारभार पारदर्शक असला तरी काही चालबाज कर्मचारी भक्तांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत देश विदेशातील सहली, आपल्या स्वतःच्या खात्यावर मोठी रक्कम, तर कधी कॅश पैसे, तर कधी महागडे गिफ्ट घेतात अशी दबक्या आवाजात शिर्डीत चर्चा सुरु असताना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उज्जैन येथील भाविकाने एक अधिकारी व एक कर्मचारी यांनी उपचाराच्या नावाखाली चाळीस लाख रुपयाची मागणी केली होती, सदर भक्तानेही नीसंकोचपने बाबांच्या श्रद्धेपोटी चाळीच लाख रुपये दिले, मात्र सदर दोनही कर्मचाऱ्यांनी खोटं बोलून हे पैसे उकळले आहे

DN SPORTS

हे भाविकाच्या लक्षात आले व. आपली यात फसवणूक झल्याचे लक्षात आल्यावर त्या भाविकाने संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर प्रकाराची माहिती दिली आहे. संस्थानमधील अनेक कर्मचारी हे देश विदेशात भाविकांच्या पैशाने सहलीला जातात, महागड्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमजा करतात असे फोटो व व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर अनेक कर्मचारी ड्युटीवर असताना त्यांच्या मार्जितील व्हीआयपी यांना थेट मंदिरात नेतात तर कधी आरतीच्यावेळी पुढे उभे करण्यासाठी लगटही करतात.

kamlakar

यामध्ये मुख्य करून जनसंपर्क कार्यालय व मंदिर प्रशासन व सुरक्षा रक्षक हेही उघड्या डोळ्याने बघून गप्प बसतात यावरून यांची मंदिरात किती चलती आहे याचा अनुभव येतो.विशेष बाब म्हणजे अनेकजन मंदिरात फोटो शेशनही करतात, यापूर्वी असं घडत नव्हतं तर विदेशात जाताना संस्थान प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत असे मात्र आता सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून अनेकांनी दर्शनाचा बाजार मांडला आहे.

कर्मचाऱ्यांना कोणताही धाक नाही तर शिस्त बिलकुल नाही. मध्यंतरी मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षक व जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मोबाईल बंदी केली होती मात्र आता त्यांचेही खासगी संबंध वाढताना दिसत असून प्रशासनाच्या दुर्लक्षाचा अनेकजन गैरफायदा घेत असून यातून मोहमाया जमा करत आहेत.

साई संस्थान प्रशासन आता या चाळीस लाख रुपयांच्या फसवणूकीचे प्रकरण किती गंभीर घेते आणि दोषींवर काय कारवाई करते हे महत्वाचं असलं तरी मागील बोगस देणगी पावती प्रकरण व बोगस दर्शन पास प्रकरण ताजे असताना हा फसवणूकीचा प्रकार सामोरं आल्याने शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button