Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
क्राईमशिर्डी

गुंड्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पोलिसांचा धाक राहिला नसल्याने गुंड्यांची घरात घुसून मारहाण

शिर्डी ( प्रतिनिधी) घरात घुसून आपल्याला शिवीगाळ व मारहाण खरा मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद बोलकी तालुका कोपरगाव येथील अर्पणा समाधान राठोड यांनी  पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अपर्णा समाधान राठोड राहणार बोलकी, ता. कोपरगाव, हल्ली रा. विजयनगर, शिर्डी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मी वरील ठिकाणी माझे पती समाधान देविदास राठोड, मुलगा युवान समाधान राठोड असे एकत्र कुटुंबात राहत असुन माझे पती समाधान हे रितेष सदाफळ रा. पानमळा, शिर्डी, ता. राहाता यांचे गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामास असुन त्यावर आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दिनांक 20/02/2025 रोजी रात्री 10.00 वा. चे सुमारास मी व माझा मुलगा युवान असे आम्ही दोघेजण घरी असतांना मी ओळखत असलेले अक्षय पगारे, बाबु जाधव (पुर्ण नाव माहीत नाही) दोन्ही रा. साई शरणम हॉटेलचे मागे, निघोज, ता. राहाता

तसेच पप्पु व चंदु (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे माझे घरी आले व आमच्या घराचा दरवाजा जोरजोरात वाजवल्याने मी दार उघडले असता ते सर्वजण बळजबरीने माझे घरात घुसले व मला म्हणाले की, तुझा नवरा समाधान व त्याचा मालक रितेष सदाफळ हे कुठे आहेत, तेव्हा मी त्यांना सांगितले की, ते सध्या घरात नाही. तुम्ही नंतर या असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

त्यावेळी मी त्यांना मला शिव्या देवु नका असे म्हटले असता त्याचा त्यांना राग आल्याने मला अक्षय पगारे, बाबु जाधव यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर चंदु व पप्पु हे मला म्हणाले की, तु आत्ताचे आत्ता समाधान व त्याचा मालक रितेष यांना घरी बोलावुन घे, नाहीतर मी तुला व तुझ्या मुलाला जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर माझ्या लहान मुलाला पप्पु याने हाताने जमीनीवर ढकलुन दिले. तेव्हा मी मोठमोठ्याने आरडा ओरडा केल्यानंतर घराबाहेरआजुबाजुचे लोक जमा झाल्याने अक्षय पगारे, बाबु जाधव तसेच पप्पु व चंदु

असे सर्वजण माझे घरातुन पळून जात असताना त्यातील चंदुने माझे टी.व्ही. जवळ बँक कलेक्शनच्या पुस्तकात ठेवलेले पाच हजार रुपये घेवुन गेला. त्यानंतर मी माझे पती समाधान राठोड यांना फोन करुन झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर माझे पती समाधान व त्यांचे मालक रितेष सदाफळ हे वरील इसमांकडे विचारपुस करणेकरिता गेले होते. परंतु त्यातील कोणीही त्यांना मिळुन आले नाही.

तरी मी व माझा मुलगा युवान असे आम्ही दोघेजण आमचे घरात असताना अक्षय पगारे, बाबु जाधव तसेच पप्पु व चंदु असे सर्व जण बळजबरीने माझे घरात घुसुन तुझा नवरा समाधान व त्याचा मालक रितेष सदाफळ असे कोठे आहे. असे विचारुन मला शिवीगाळ मारहाण करुन तु जर आम्हाला माहीती दिली नाही तर तुला जिवे मारुन टाकु अशी धमकी दिली व माझे मुलाला हाताने जमीनीवर ढकलवुन दिले.

त्यावेळी मी आरडओरडा केल्याने आजुबाजुचे लोक जमा झाले ते बघुन अक्षय पगारे, बाबु जाधव, पप्पु व चंदु असे सर्वजण तेथून पळून जात असताना त्यातील चंदुने माझे टी. व्ही. जवळ बँक कलेक्शनच्या पुस्तकात ठेवलेले तिन हजार रुपये घेवुन गेले. म्हणुन माझी अक्षय पगारे, बाबु जाधव (पुर्ण नाव माहीत नाही) दोन्ही रा. साई शरणम हॉटेलचे मागे, निघोज, ता. राहाता तसेच पप्पु व चंदु (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांचे विरुध्द फिर्याद देण्यात आली असून या फिर्यादीनुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button