Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
शिर्डी

देशातील सर्वात मोठ्या भोजनग्रहात तब्बल एक लाख भक्तांनी घेतला साबुदाणा खिचडीचा लाभ

श्री साईबाबा संस्थान, शिर्डीने आज आषाढी एकादशी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. याशिवाय, श्री समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
आषाढ शु ।।११ शके १९४६ आषाढी एकादशी हा दिवस श्री साईबाबांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधून संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रात्री 8 ते 9 या वेळेत मंदिर कर्मचारी धर्मराज उपाडे यांचा कीर्तन कार्यक्रम संपन्‍न होईल. रात्री 9:15 वाजता श्रींची पालखी शिर्डी गावातून मिरवणुकीत काढण्यात येणार असून पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर श्रींची शेजारती करण्यात संपन्‍न होईल.
आषाढी एकादशीनिमित्त श्री साईप्रसादालयात आयोजित साबुदाणा खिचडी महाप्रसादामध्ये सुमारे 55 हजार भाविकांनी प्रसाद ग्रहण केला. तर 29,200 भाविकांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला. यासाठी संस्थानने 71 पोते साबुदाणा, 45 पोते शेंगदाणे, 1020 किलो तूप आणि सुमारे 3600 किलो बटाटे यासह इतर अनेक साहित्याचा वापर केला.
याशिवाय, आषाढी एकादशीनिमित्त कर्नाटकमधील देणगीदार श्री एस.प्रकाश यांच्या देणगीतून श्री साईबाबा समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button