भारतीय जनता पक्षाचे नेते ना.राधाकृष्ण विखे हे शिर्डी विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत.परंतु विधानसभेची चाहूल लागली की इतरवेळी कुठेही न दिसणारे डॉ. राजेंद्र पिपाडा हे ना.राधाकृष्ण विखे यांच्यावर शेजारच्या मतदारसंघातील नेत्यांच्या सांगण्यावरून जाहिरपणे प्रसार माध्यमातून टिका करतात.यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होत आहे.त्यामुळे डॉ.राजेंद्र पिपाडांची यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पिपाडा हे ना.राधाकृष्ण विखे यांच्यावर सातत्याने टीका करत आहे.ना.विखे पाटील हे विकासात्मक दृष्टिकोन असलेले नेते आहेत त्यांनी निळवंडे पाटपाण्याचा ज्वलंत प्रश्न मार्गी लावला, शिर्डीयेथे एमआयडीसी व त्यासाठी रस्ते वीज विकासासाठी १०० कोटी मंजूर करून आणले,अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूरकरून त्यास ०६ एकर जमीन देखिल मोफत मिळवून दिली, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी पुन्हा मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली,वयोश्री योजना देशात पहिल्या क्रमांकाने शिर्डी मतदार संघात राबविण्यात आली.
शिर्डी विधानसभा मतदार संघाच्या मूलभूत विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे चालू आहेत.हे मात्र पिपाडांना का दिसत नाही हे विशेष, एकाच पक्षात राहून पक्षश्रेष्ठी असणाऱ्या ना.विखे पाटील यांच्यावर टीका करतात. त्यामुळे पिपाडांकडून वारंवार पक्षशिस्तीचे उल्लंघन होत आहे.
पिपाडा हे फक्त विधानसभेच्या निवडणुका आल्या की विखे यांच्यावर शरसंधान साधतात. स्वतः मात्र मतदारसंघातील प्रश्नाबाबत कधी रस्त्यावरवर आले नाहीत. तसेच पक्षाच्या नेत्यांवर इतर पक्षाच्या नेत्यांनी हल्ले केले. त्यावर कधी प्रतिक्रिया दिली नाही, ना कधी निदर्शने केली तसेच कधी पक्ष बैठका व कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत आता मात्र शेजारच्या नेत्यांबरोबर कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित राहायचे आणि खाली आले कि ना.विखेंवर टीका करायची. स्वतःकडे १० वर्ष राहाता नगर परिषद असतांना आपण कोणता विकास केला..? हा मोठा प्रश्न आहे केवळ वरिष्ठ पक्षश्रेठीच्या संपर्कात राहायचं आणि लाभाची पद मिळवण्यासाठी खटाटोप करायचा खाली मात्र विकास व पक्ष संघटना शून्य एवढंच यांचा अजेंडा
त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांनी केली आहे.
जाहिरात
DN SPORTS