Letest News
मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप)
Blog

शिर्डीत अवैध धंद्याबरोबरच अपहरण ,खंडणीचाही वाढला प्रकार!

शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी जवळील निमगाव येथील अपहरण व खंडणी प्रकारात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यासंदर्भात आता वेगवेगळी चर्चा सुरू झाली असून खंडणीखोर हे अट्टल गुन्हेगार असल्याचे बोलले जात आहे. या गुन्हेगार खंडणीखोरांपैकी एकाने थेट एका माजी खासदारांच्या नावाने संघटना स्थापून त्यांच्या नावाखाली नेतेगिरी करत खंडणी वसूल करण्याचा व गुन्हेगारी करण्याचा धंदा मांडला आहे .अशी चर्चा आता शिर्डी व परिसरात होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर राजेंद्र पिंपडा यांनी आरोप केले होते की खंडणी प्रकरणात गुन्हेगार असलेला खंडणीखोर आरोपी याने काही दिवसापूर्वी माजी खासदारांच्या  नावाने संघटना स्थापन करून शिर्डी येथे कार्यालय सुरू केले होते .त्याचे वृत्त व फोटोही प्रसारित झाले होते .

मात्र डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी आरोप केल्या केल्याने हे फलक तात्काळ काढून टाकण्यात आले होते. मात्र परत  या खंडणी प्रकरणामुळे या आरोपीची खरी वास्तविकता परत एकदा समोर आली आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. हे  नुकत्याच शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या खंडणी गुन्हा प्रकरणावर सिद्ध झाले आहे. या प्रकरणात खंडणीचा जो गुन्हा दाखल झाला आहे ते आरोपी तसेच फिर्यादी  हे मित्र असल्याचे समजते.

दररोज यांचे उठणेंबसने होते व पैशावरून त्यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे . त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला उचलून एक लाख रुपयांची मागणी केली. आणि हॉटेल भाड्याने चालवायचे असेल तर महिन्याला एक लाख रुपये दे असे म्हणून मारहाण केली अशी फिर्याद पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. या फिर्यादीमध्ये आरोपी सागर पगारे, बनू मते,व आशिष यांच्यावर  गुन्हा दाखल झाला आहे. नितीन भाऊसाहेब शहाणे यां फिर्यादीने हा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलीस अधिक तपास करत आहेत.ज्या हॉटेल वरून हा गुन्हा घडला. त्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासणी गरजेचे आहे. कारण त्यातूनच खरेखोटे यांची सर्व माहिती उघड होणार आहे. हे गुन्हेगार आरोपी इतरांना दहशत निर्माण करावी म्हणून आपापसात हाणामाऱ्या करतात. भर रस्त्यात गर्दी करून टोळ्या जमा करतात. धाक दाखवण्याचा प्रयत्न करतात व त्यातून आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात.

पैशाच्या लोभापायी हे नशेत काही करायला तयार होतात. त्यामुळे कधी राजकीय , तर कधी दादागिरीच्या बळाचा वापर करतात. मात्र आता गुन्हा दाखल झाल्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणारे शिर्डीमध्ये अवैध धंदे तेजीत सुरू आहे,

गुन्हेगारी प्रवृत्ती परत बळावत चालली आहे, नुकतेच संगमनेर येथील तरुणींवर शिर्डीत आणून बलात्कार झाला. शिर्डीतील पालखी रोडवर हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना पकडण्यात आले. आता अपहरण ,खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिर्डी व परिसरात मटका दारू जुगार सर्रास सुरू आहे.

मात्र त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली असून त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मागील अकार्यक्षम पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या काळात जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत गेली. शिर्डीतही गुन्हेगारी मोठी वाढली आहे. यापुढे अहिल्यानगर जिल्ह्यात कर्तव्यदक्ष म्हणून नवीन आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना जिल्ह्यत पूर्वी काम केलेले असल्यामुळे त्यांना चांगली माहिती आहे.

त्यामुळे ते या गुन्हेगारी प्रवृत्तीला नक्कीच ठेसून काढतील अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. शिर्डीत  त्यांनी या खंडणीखोरांचा बंदोबस्त करावा. राजकीय पदाचा किंवा ओळखीचा वापर करून आणि व्हाईट कलर राहून दुसरीकडे अपहरण खंडणी आणि गुन्हेगारी आदी  प्रकार करणाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष    वमने, पोलीस निरीक्षक गलांडे यांनी विशेष लक्ष घालून कडक कारवाई करावी .अशी मागणी शिर्डीतील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button