
अहिल्यानगर शहरातील देशपांडे हॉस्पीटल, पटवर्धन चौक येथी हिंदु व मुस्लीम समाजाचे श्रध्दा स्थान असलेले धार्मिक स्थळ सय्यद घोडेपीर दर्गाचे अज्ञात काही इसमांनी तोडफोड करुन नुकसान करुन हिंदु व मुस्लीम धर्माचा अपमान करुन समस्त हिंदु मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भानवा दुखावन्याचा प्रयत्न केला, तसेच दंगल घडुन आणण्याचे उद्देशाने कृत्य केले आहे.
या बाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे वसिम रौफ खान, रा. पटवर्धन चौक, आनंदी बाजार, अहिल्यानगर यांचे तक्रारी वरुन कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. 761/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 298, 299, 324 (4), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
मा.श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी सदर घटनेच गांभीर्य लक्षात घेवुन त्वरीत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर, कोतवाली पोलीस ठाणे व तोफखाना पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन आरोपीचे शोध घेणे कामी सुचना व मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे नेमलेल्या पोलीस पथकाने अहिल्यानगर शहरातील घटने ठिकाणाच्या व परिसरातील विवीध सिसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करुन घटनेत वापरलेला जेसीबीचा शोधला असता, सदर जेसीबी मिळुन आल्याने, जेसीबी मालक अरुण गोविंद खरात, रा.समता चौक, सावेडी, अहिल्यानगर यांना स्थानिक गुन्हे शाखा येथे बोलावुन त्यांच्याकडे जेसीबी चालका बाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा जेसीबी बबलु पाल, रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, ता.जि. अहिल्यानगर याच्या ताब्यात असल्याचे सांगितले.
त्या अधारे जेसीबी चालक बबलु पाल याचा व्यवसायीक कौशल्याचे आधारे शोध घेतला असता तो बोरुडे मळा, भुतकरवाडी, ता.जि. अहिल्यानगर येथे मिळुन आल्याने त्यास गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यास विश्वासात घेवुन इतर साथीदाराबाबत विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार 2) योगेश झोंड, रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, ता.जि. अहिल्यानगर, 3) सचिन दारकुंडे, रा.समतानगर, सावेडी, ता.जि.अहिल्यानगर,
4) दत्ता गायकवाड, (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) व इतर तीन ते चार इसम आशांनी मिळुन केला असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर इतर आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी क्रं. 2) योगेश सखाराम झोंड, रा. धोंडेवाडी रोड, वाळकी, ता.जि.अहिल्यानगर हल्ली रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, ता.जि. अहिल्यानगर हा बोरुडे मळा, अहिल्यानगर, येथे मिळुन आला आहे. नमुद दोन्ही आरोपींना, तसेच जेसीबी मालक नामे अरुण गोविंद खरात, रा.समता चौक, सावेडी, अहिल्यानगर
नमुद गुन्ह्याचे पुढीत तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. तसेच जेसीबी मालक नामे अरुण गोविंद खरात, रा.समता चौक, सावेडी, अहिल्यानगर यास सदर गुन्ह्याचे चौकशी कामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.1)जेसीबी चालक बबलु पाल, रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, ता.जि. अहिल्यानगर 2) योगेश झोंड, रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, ता.जि. अहिल्यानगर, रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, ता.जि. अहिल्यानगर
3)जेसीबी मालक नामे अरुण गोविंद खरात, रा.समता चौक, सावेडी, अहिल्यानगर
हा बोरुडे मळा, अहिल्यानगर, यांना नमुद गुन्ह्याचे पुढीत तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर तसेच मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्त कारवाई केलेली आहे.