

मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/ राहुल व्दारके, पोना/ रिचर्ड गायकवाड, पोना/ सोमनाथ झांबरे, पोना/ बाळासाहेब नागरगोजे, पोकॉ/ रमीझराजा आतार, पोकॉ/ प्रकाश मांडगे, पोकॉ/ अमोल आजबे यांचे पथक तयार करुन, सदर पथकास अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
दिनांक 01/09/2025 रोजी अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी नेमण्यात आलेले पथक सोनई पो.ठाणे हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढत असतांना, पथकास सोनई-नेवासा रोड लगत, अमळनेर गांवाच्या शिवारात, जोरे वस्ती येथे एक इसम महाराष्ट्रात राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला मावा, सुंगधी तबाखू चोरुन विक्री करत असल्याची गोपनिय बातमी कळाली असता, बातमीची खात्रीकरुन, पोनि किरणकुमार कबाडी यांना माहिती देवुन, त्यांचे आदेश व मार्गदर्शनाने छाप्याचे नियोजन केले. मिळालेल्या गोपनिय बातमीच्या ठिकाणी छापा टाकला असता, तेथे इसम नामे सुनिल आण्णासाहेब येळे यांना ताब्यात घेवुन झडती घेतली. आरोपी सुनिल आण्णासाहेब येळे, वय 28 वर्षे, रा. अंमळनेर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांनी दाखविलेल्या ठिकाणी सुंगधीत तंबाखु, सुंगधीत तयार मावा, मावा तयार करण्याची कच्ची सुपारी, सुंगधीत मावा तयार करण्याचे मशिन व वजनकाटा इत्यादी असा एकुण 1,54,100/- रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ/ 1191, अमोल श्रीरंग आजबे, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनुक्रमे गु.र.नं. 324/2025 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 123, 223, 274, 275 प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आले असुन, गुन्हयात एकुण 1,54,100/- रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आरोपी व मुद्देमाल सोनई पो.स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.