शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी लगत असलेल्या निमगाव कोराळे गावात राहत असलेल्या रवींद्र माळी वय ४८ यांचा मुलगा रोहित रवींद्र माळी वय १९ यांच्या समोर चार वर्षापुर्वी त्याच्या वडीलांचा धारदार शस्त्राने खुन करण्यात आला होता त्यात काही आरोपींना अटक करण्यात आली होती
त्यातील सध्या जामिनावर सुटलेला खुनातील एक आरोपी रवींद्र राजेंद्र बनसोडे वय २७ रा शिर्डी हा सध्या जामिनावर सुटलेला आहे त्याने ११ फेब्रुवारी रोजी मी दुचाकी वरुन जात असताना नगर मनमाड रोडवर असलेल्या गेस्ट हाउस समोरुन दुचाकीवरून जात असताना दुचाकीला धक्का मारुन मला पाडले
मी जखमी झालो त्यावेळी रवींद्र बनसोडे म्हणाला की तुझ्या वडीलांचा खुन झाला आहे तु साक्षीदार आहे आमच्या विरोधात कोर्टात साक्ष देऊ नको ती केस तु मागे घे नाहीतर तुझ्या वडीलासारखाच तुला सपुन टाकु अशी धमकी दिल्याची तक्रार रोहित रवींद्र माळी याने शिर्डी पोलीस ठाण्यात दिल्यामुळे शिर्डी पोलीसांनी घटनेची तात्काळ गंभीर दखल घेत
शिर्डी पोलीसांनी भारतीय न्याय संहिता ११०,३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गंलाडे हे करीत आहे या घटनेनंतर माळी कुंटबिय भयभीत झाले असून पोलीसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे