सध्या आधुनिक व संगणकीय युगामध्ये अनेक सोशल मीडिया द्वारे बातम्या, लेख ,माहिती प्रत्येकाला मिळत असते. मात्र या सर्व माध्यमा मध्ये वृत्तपत्र हे आपले महत्त्व आजही टिकून आहे. अशा वृत्तपत्रांना एक मोठा वाचक वर्ग असून वृत्तपत्रावर वाचकांचा मोठा विश्वास आहे. म्हणून आज आधुनिक व वेगवान युगातही वृत्तपत्रे हे समाजाचे आरसा म्हणून काम करत आहेत.
आणि असाच समाजाचा आरसा म्हणून सातत्याने गेली 14 वर्ष जनसेवेचे व्रत म्हणून काम करत असलेले दैनिक साई दर्शन आज श्री सद्गुरू साईबाबांच्या कृपेने व आपणा सर्वांच्या सहकाऱ्यांने या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 15 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. याचा मोठा आनंद होत आहे.
आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीतूनच एखादे दैनिक सुरू व्हावे अशी अनेकांची इच्छा होती व त्या इच्छेतून गेल्या 14 वर्षापूर्वी आम्ही पत्रकार मित्र एकत्र येऊन या दैनिकाचे शिवधनुष्य उचलण्याचा निर्धार केला आणि शिर्डी व परिसरातील थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने ते सुरू केले.
ते आजतागायत श्री साईबाबांच्या कृपेने व आपल्या सहकार्याने सुरू आहे.
दैनिक साईदर्शन हे श्री साईबाबांच्या सर्व धर्म समभाव व श्रद्धा सबुरीची शिकवण अंगीकारत निर्भीडपणे सुरू असून या दैनिकाच्या माध्यमातून दीनदलित, गोरगरिबांचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्याचे काम दैनिक साई दर्शन च्या माध्यमातून झाले आहे व होत आहे व पुढेही सातत्याने होत राहणार आहे.
सत्याला सत्य व खोट्याला खोटं म्हणणारे दैनिक निर्भीडपणे आपले काम पुढे चालू ठेवत राहणार आहे. दैनिक साई दर्शन च्या या 14 वर्षाच्या प्रवाहात अनेक संकटाच्या लाटा आल्या. मात्र या संकटाच्या लाटेमध्येही दैनिक साई दर्शन एक लव्हाळा म्हणून आजही तसेच डाम डौलात सुरू आहे. दैनिक साई दर्शन मधून नेहमी सत्य उजेडात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला व येत आहे. मात्र सत्य परेशान होता है लेकिन पराजित नही होता.
या वाक्याप्रमाणे दैनिक साई दर्शनला सत्य मांडत असताना, नागरिकांचे प्रश्न समस्या मांडल्यानंतर अनेक अडचणी आल्या. मात्र सर्व अडचणींवर मात करत दैनि साईदर्शनचीच जीत होत गेली. कारण सत्याचाच नेहमी विजय होत असतो.श्री साईबाबांनी कोणतीही गोष्ट करताना सत्य, निस्वार्थ मनाने करावी .अशी शिकवण दिली होती. सर्व धर्म समभाव ठेवून व श्रद्धा आणि सबुरी ठेवून कोणतेही काम केले तर निश्चित यश मिळाल्याशिवाय राहत नाही ही साईबाबांची शिकवण दैनिक साई दर्शन या वृत्तपत्राच्या माध्यमातून अंगीकारत आजही हे वृत्तपत्र त्यामुळे मोठ्या दिमाखात सुरू आहे.
दैनिक साई दर्शन ने अनेक उन्हाळी पावसाळी पाहिले. मात्र कधीही न डगमगता आपला मार्गक्रमण करत करत आज पंधरा व्या वर्षात दैनिक साई दर्शन पदार्पण करत आहे. आतापर्यंत अनेक समस्यांची, प्रश्नांची उकल दैनिक साई दर्शनने केली. शिर्डीतील पाकीटमारी ,गुन्हेगारी ,याविषयी निर्भीडपणे या वृत्तपत्रातून सातत्याने लेखाजोखा मांडला .त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला.
शिर्डीत आलेल्या साई भक्तांना कुठल्याही त्रास होऊ नये म्हणून साईभक्तांची सातत्याने बाजू लावून धरत साई भक्तांची सेवा हीच साईबाबांची सेवा म्हणून सातत्याने प्रयत्न दैनिक साई दर्शन च्या माध्यमातून करत आलो व यापुढेही करत राहणार हे चिरकाल सत्य आहे. म्हणूनच आजही दैनिक साई दर्शन वर आपणा सर्वांचा विश्वास आहे.सध्या वाढती लोकसंख्या व त्यामुळे प्रत्येकाला विविध समस्या निर्माण होत आहेत.
शिर्डी सारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राच्या धार्मिक स्थळी तर विविध प्रश्न ,समस्या यांनी ग्रामस्थ ,साईभक्त ,व्यावसायिक, मोलमजुरी करणारे गरीब, श्रीमंत या सर्वांनाच ग्रासले आहे. यातून मार्ग काढण्याचे काम, जनतेच्या अनेक समस्या प्रश्न जगापुढे आणण्याचे गरजेचे आहे. मात्र त्यावर सहसा कोणी आवाज उठवत नाही. मात्र प्रत्येक जण आपलं पाहतो . कुणी त्या विरोधात भाष्य करत नाही. मात्र दैनिक साई दर्शन ने निर्भीडपणे आजपर्यंत शिर्डीतील पाकीटमारी असो,
अवैध व्यवसाय, अवैध वाहतूक, गुन्हेगारी प्रवृत्ती , गांजा जुगार, याबरोबरच शिर्डी व परिसरातील शैक्षणिक, औद्योगिक ,रोजी रोटीच्या समस्या ,अतिक्रमणधारकांच्या समस्या ,व्यावसायिकांच्या समस्या, या निर्भीडपणे मांडण्याचे काम दैनिक साई दर्शन आपल्या माध्यमातून करत आले आहे व यापुढे करत राहणार आहे. सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात व्यावसायिक किंवा पोटाचा प्रश्न असला तरीही कमाईचे साधन म्हणून पत्रिकरीता करणे हे दैनिक साई दर्शनला कदापिही मान्य नाही. कधीही दैनिक साई दर्शनने प्रस्थापितांच्या कटकारस्तांनच्या अधिपत्याखाली लाचारी गुलामी धरली नाही.
वैयक्तिक स्वार्थासाठी वेळोवेळी बोटचेपे धोरण स्वीकारले नाही .आपला स्वाभिमान आत्मविश्वास कधी सोडला नाही. अन्याय, अत्याचारराला डगमगले नाही. भ्रष्टाचार राजकीय दहशत याला कधी घाबरले नाही. अनेकदा विश्वासघात व फसवणूक करण्याचाही प्रयत्न होत गेला मात्र श्री साईंच्या कृपेने व स्वाभिमानी वृत्तीने सुरू असलेले दैनिक साई दर्शन कधीही कोणत्याही गोष्टीला फसले नाही. व स्वाभिमानाने सरळ पुढे पुढे चालत राहिले व हाच खरा दैनिक साई दर्शन चा मोठा इतिहास आम्हाला आजही प्रेरणा, ऊर्जा देऊन जातो.
सध्याच्या आधुनिक व वेगवान युगामध्ये मोठी स्पर्धा आहे. वृत्तपत्रांमध्ये मोठी स्पर्धा आहे. माध्यमांमध्ये स्पर्धा आहे .मात्र त्यामध्येही दैनिक साई दर्शन आजही टिकून आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान असून दैनिक साई दर्शन वृत्तपत्रा बरोबरच दैनिक साई दर्शन युट्युब चॅनेल ,त्याचप्रमाणे साई दर्शन पोर्टल व इतर सोशल मीडियावरही साई दर्शन काम करत आहे व या साई दर्शन च्या प्रगतीसाठी श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाबरोबरच सर्व वाचक, विक्रेते ,हितचिंतक यांचे मोठे सहकार्य आहे.
धन्यवाद! ओम साई राम!