Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरक्राईम

आभिनेता सोनु सुदच्या फतेह चित्रपटात शिर्डीच्या फसवणुकीची दखल

मुंबई – अभिनेता आणि साईचा भक्त असलेल्या सोनू सूदनं नववर्षाच्या निमित्तानं आज सहपत्नीक शिर्डीत दाखल झाला. तो आगामी ‘फतेह’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची कथाही त्यानं लिहिली आहे. त्यात सोनू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या आधी साईचा आशिर्वाद घेण्यासाठी सोनू सूदने आपल्या पत्नीसह साई दरबारी हजेरी लावत, साईंच्या दुपारच्या अर्थात माध्यन्ह आरतीला हजेरी लावली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

‘फतेह’ चित्रपटला यश मिळो हीच प्रार्थना साईचरणी केली असल्याच, सांगत या चित्रपटात सायबर फसवणूक झालेल्यांची कहाणी दाखवण्यात आली असल्याचं तो म्हणाला. शिर्डीतील ही फसवणूक झालेल्याचा कथानकात समावेश करण्यात आला असल्याचं त्यानं सांगितलंय. साईभक्त असलेला सोनू गरीबांचा ‘मसीहा’ म्हणून ही ओळखला जातो. माझ्या आगामी चित्रपटाच्या कमाईतील हिस्सा गोरगरिबांच्या कल्याणासाठी वृध्दाआश्रम व मुलांच्या कल्याणसाठी वापरला जाणार असल्याचं सोनूनं म्हटलंय.

साईबाबांचा आशीर्वाद घेवून चित्रपटाचा रंगिन दुनियेत पदार्पण केलं होतं. आता पहिल्यांदाच तो स्वतःच्या ‘फतेह’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार असून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला चांगलं यश मिळावं यासाठी आज साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचही सोनूनं यावेळी सांगितलं. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं शॉल साई मूर्ती देवून सोनूचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.

सूदच्या ‘फतेह’ या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला होता. यातील त्याची आक्रमकता पाहून ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘पुष्पा’तील वेगवान अ‍ॅक्शनची आठवण झाल्या शिवाय राहात नाही. सामान्य माणसांची अश्रू पुसण्यासाठी नेहमी आघाडीवर राहणारा सोनू सूद पडद्यावरही सामान्य लोकांसाठी एक मोठी लढाई लढताना या सिनेमात दिसत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

‘फतेह’ चित्रपटात सोनू सूदबरोबर जॅकलीन फर्नांडिस, नसीरुद्दीन शाह, विजय राज, शिव ज्योती राजपूत, दिव्येंदू भट्टाचार्य, प्रकाश बेलवाडी, बिन्नू ढिल्लोन यासारखे कलाकार आहेत. या चित्रपटातून सोनू सूद लेखन आणि दिग्दर्शनात हात आजमावणार आहे. हा त्याचा पहिलाच दिग्दर्शकीय चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनाली सूद आणि सोनू सूद यांनी केली असून हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button