Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
क्राईमशिर्डी

सोयाबीन चोरीतील आरोपीचे शिर्डीतुन पलायन

शिर्डी (प्रतिनिधी)
मध्यप्रदेश येथील सोयाबीन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीसह अधिक चौकशी निमित्ताने शिर्डीत आलेल्या पोलीस पथकाला रात्री येथील एका हॉटेलमध्ये नजर चुकवून एका आरोपी पहाटे खिडकीतून पळून गेला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून त्यामुळे शिर्डी परीसरात खळबळ उडाली आहे
अधिक माहिती अशी की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


-लिमाचौहान जिल्हा राजगढ राज्य मध्यप्रदेश येथील सब इन्स्पेक्टर अनिल राहोरीया यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, मी वरील ठिकाणी मी एक वर्षापासुन नेमणुकीस आहे . थाना पचोर जि. राजगढ मध्यप्रदेश गुन्हा रजिस्टर नंबर ४०६ /२०२४ ,३०३ (२ ) बी. एन. एस. या गुन्हयाचा सोयबिन चोरी चा तपास चालु असुन त्या तपासा साठी माझ्या सोबत पोलीस पथकातील कर्मचारी राहुल रघुवंशी अजय यादव खेमेन्द्रे खीची रवेन्द्र जाट रवि जाट असे पथका बरोबर गुन्हयातील आरोपी नामे मोहसिन खान उर्फ फिका खान रा. बालसमद थाना कसरवाडा

आरिफ उर्फ रहीम खान रा. बालसमद थाना कसरवाडा सोनु उर्फ नवाब खान रा. बलगांव थाना बलकवाडा सिंकदर उर्फ छोटा खान रा. बलगांव थाना बलकवाडा फरियाद उर्फ मंजुर खॉ रा यांच्यासह १७ नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश येथुन निघालो २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिर्डी येथे आलो व शिर्डी मध्ये इकबालभाई शेख रा. शिर्डी ता. राहाता
जि. आहिल्यानगर यांच्याकडे सोयाबिन चोरीची विचारपुस करून रात्री उशीर झाल्याने एका निमगाव परीसरातील हॉटेल . येथे थांबलो.दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सांय ५ वाजेच्या सुमा

आम्ही शिर्डी येथील हॉटेल ड्रीम मध्ये . रुम नंबर २०३ मध्ये पोलीस अधिकारी अनिल राहोरिया, राहुल रघुवंशी अजय यादव असे होते आणि २०६ मध्ये पोलीस कर्मचारी खेमेन्द्रे खीची रवेन्द्र जाट टारवि जाट व त्याच्या सोबत आरोपी नामे 1) मोहसिन खान उर्फ फिका खान रा. बालसमद थाना कसरवाडा 2) आरिफ उर्फ रहीम खान रा. बालसमद थाना कसरवाडा 3) सोनु उर्फ नवाब खान रा. बलगांव थाना बलकवाडा 4) सिंकदर उर्फ छोटा खान रा. बलगांव थाना बलकवाडा 5) फरियाद उर्फ मंजुर खाँ रा. बालगाव ठाणा बलकवाडा जि. खरगौन असे आरामसाठी थांबले असता

त्यांच्या रुममध्ये सोबत असलेला आरोपी नामे फरियाद उर्फ मंजुर खाँ रा. बालगाव ठाणा बलकवाडा जि. खरगौन हा रुम नंबर २०६ मध्ये आमच्या अंमलदार यांची नजर चकवुन पहाटे ५ वाजेच्या सुमारास खिडकीतून पळून गेला आहे. आम्ही सदर पळून गेलेल्या आरोपीचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला पंरतु तो मिळून आला नाही

म्हणून माझी आरोपी नामे फरियाद उर्फ मंजुर खॉ रा. बालगाव ठाणा बलकवाडा जि. खरगौन यांच्याविरुध्द भारतीय न्यांय संहीता २०२३ चे कलम २६२ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर ६४२ /२०२४ भादवि कलम २६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button