Letest News
पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्... मागील भांडणाच्या कारणावरून एका कुविख्यात गुंड्याने केले गोळीबार श्रीरामपूर शहर हादरले  थायलंड येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये शिर्डी चा निलेश वाडेकर याने मिळवले ब्रांझ मेडल कोट्यावधिचे मुद्देमाल जप्त करत नगर गुन्हे अन्वेषण पथकाने केली कामगीरी भारी !! शरद पवारास जिल्हाधिकारी साहेबांचा चांगलाच हिसका ! शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर देह व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी केले चार हॉटेल सील हॉटेल् सील झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ गणेशोत्सवात ‘बाप्पाच्या गप्पा’ उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती
अ.नगरराजकीय

चक्क दिड हजाराला पुरस्कार ! अनेक हवशे – नवशे ठरताहेत शिर्डीत पुरस्काराचे मानकरी !!

राहाता(शाह मुश्ताकअली )

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

सध्या राज्यात विशेषता आपल्या जिल्ह्यातही विविध नावाने राष्ट्रीय, राज्य ,जिल्हास्तरीय पुरस्कार देण्याचे पेव फुटले आहे. आता पैसे देऊन पुरस्कार मिळवण्याचे प्रकारही वाढले आहेत. पैसे घेऊन पुरस्कार देणाऱ्या अनेक संस्था संघटना कार्यरत झाले आहेत. असे सध्या तरी दिसून येत आहे.

kamlakar


‌‌विविध क्षेत्रातील उल्लेखनीय विधायक कार्य करणाऱ्यांना अनेक सेवाभावी संस्था, संघटना,फाऊंडेशन किंवा प्रतिष्ठान अशा विविध संस्था, संघटनांकडून पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते ही अत्यंत चांगली बाब होय, समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा उचित सन्मान हा झालाच पाहिजे

त्यात कुणाचेही दुमत नाही,कारण त्या पुरस्कारार्थीचे सामाजा साठी तीतकेच महत्त्वाचे योगदान असते, करीता त्यांचा सन्मान होणे हे स्वाभाविकच करीता विविध खऱ्या संस्था,संघटना खऱ्या आणी योग्य व्यक्तीच्या सन्मानासाठी त्यास पुरस्कार देवून गौरान्वित केले जाते, राज्यभरातील विविध सामाजिक संस्था,संघटनांचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे शिर्डीत असे कित्येक चांगले उपक्रम नेहमीच राबविण्यात येतात,

परंतू अशाच काही संधीचा फायदा उचलत काही संधी साधू मंडळींनी या पवित्र कार्यास चक्क पैसे कमावण्याचा धंदा बनवला आहे, चक्क पैसे घेवून पुरस्कार विक्रीचा व्यवसायच मांडला असल्याचे काही ठिकाणी दृष्टीपथास येत आहे ही बाब तीतकीची गंभीर आणी लाजीरवाणी देखील आहे,

यातील कुणाचे कोणतेच योगदान नसताना केवळ पैश्याच्या हव्यासापोटी मोठ मोठी उपमा देत अमुक भुषण, तमुक भुषण आमका रत्न,तमका रत्न अशा गोंडस नावाखाली राज्यस्तरीय पुरस्कार विक्रीचा व्यवसाय मांडला असल्याचे विश्वसनीय वृत आहे,
यामध्ये काही ठिकाणी यांनी एजंट लोकांची नियुक्ती देखील केली असल्याचे समजते ते एजंट राज्यभरातील विविध गावो गावी,शहरात फिरुन हवशे – नवशे काही तोतया सामाजिक कार्यकर्ते किंवा विविध क्षेत्रातील काही लोकांना पुरस्कार घेण्यासाठी गळ घालतात,

एका पुरस्कारास पंधराशे रुपये चार्ज अकारला जातो, त्यातील हजार रुपये पुरस्कार देणाऱ्या टोळी प्रमुखास दिले जातात तर पाचशे रुपये एजंटास कमीशन म्हणून मिळतात,
पुरस्कार वितरणासाठी शिर्डी हे शहर निवडले जाते,

पुरस्कार घेण्यासाठी राज्यभरातून शंभर ते दोनशे हौशीराम नवसाताईंना शिर्डीत बोलावायचे याठिकाणी राहण्याकरिता श्रीसाईबाबा संस्थान चे भक्त निवास देखील कमी पैशात सहजरित्या उपलब्ध होते, त्यावर प्रसादलायात भोजनाची व्यवस्था ही आगदी विनामूल्य फ्री च असते, शिवाय त्यावर श्री साईबाबाजींचे दर्शनही घडते.


मात्र पुरस्कार वितरणास प्रमुख पाहुणे असलेल्या काही नंदनाकडून या ठिकाणी एखादे हॉटेल किंवा लॉन्स / फंग्शन हॉल स्पॉन्सरशिपद्वारे मिळवायचे,
ज्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करावयाचे आहे,

त्यांच्या माथी भक्तनिवास रुम्स भाडे टाकायचे, ज्यांची प्रमुख उपस्थिती असेल त्याच्या माथी सर्वांचे चहा- पाणी, नास्ता इ.खर्च टाकायचा, कार्यक्रम अध्यक्षाच्या माथी कार्यक्रम साऊंड सिस्टम,डेकोरेशन खर्च मारायचा, कार्यक्रम उद्घाटकाकडे ट्रॉफी, सन्मानपत्र खर्च टाकायचा, सर्वकाही वरच्यावर फुकटात भागवायचे अशा प्रकारे शिर्डी बाहेरील काही लोकं शिर्डी सारख्या पवित्र नगरीत भावनात्मक खेळ खेळून अनेकांकडून पैसे लुबाडण्यात मोठे तरबेज झाले आहेत.

परंतु ज्या लोकांनी पुरस्कार विक्रीचा हा जो व्यावसाय मांडला आहे, त्यांचे समाजासाठी असे कोणतेच योगदान किंवा विधायक कार्य नसून केवळ पैसे कमावण्यासाठीचा त्यांचा हा नित्याचाच धंदा बनलेला आहे,अशा प्रकारे बोगसगीरीचा बाजार भरवून वर्षातून दोन, तीन,चार वेळा शिर्डीतच पुरस्कार वितरण सोहळे भरवून हजारो पुरस्कारांची विक्री करत कित्येक लाखो रुपयांची तुंबडी भरण्यात ते यशस्वी देखील होत आहेत. अशा पैसे घेऊन पुरस्कार देणाऱ्या संस्था संघटनांवर चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी आता सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button