
शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे भोजनालयात चोरट्याने महिलेच्या मंगळसूत्र वर डल्ला मारल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे विश्राती तुळशीदास नाईक वर्ष रा. गोवा यांनी फिर्यादीत म्हटले आहे कि,
दिनांक 08/07/2025 रोजी दुपारी 04/00 वा. चे सुमारास गुरुपौर्णिमा असल्याने श्री साईबाबा मंदिर शिर्डी येथे जाण्यासाठी बहीण सुंगधा व तिचा मुलगा ओम व माझी मुलगी गायत्री असे गोवा येथुन ट्रेनने निघालो व दिनांक 09/07/2025 रोजी सकाळी 11/00 वा सुमारास शिर्डी येथे पोहोचलो त्यानंतर आम्ही साई उदयान येथे रुम घेवुन राहिलो
त्यानंतर आम्ही दिनांक 10/07/2025 रोजी दुपारी 02/00 वा आम्ही दर्शन करुन श्री साई प्रसादालय येथे जेवण करण्यासाठी गेलो तेथे मी जेवण केल्यानंतर आम्ही हात धुवन तेथुन बाहेर निघालो असता माझी बहिण सुंगधा हिने मला सांगितले की तुझ्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र कुठे आहे
तेव्हा मी माझ्या गळ्यात बघितले असता माझ्या गळ्यातील मंगळसुत्र मला दिसले नाही तेव्हा माझ्या लक्षात आले की मी प्रसादालयाच्या बेसिंग मध्ये हात धुण्यासाठी गेले तेव्हा तेथे हात धुत असताना गर्दीचा फायदा घेवुन अचानक पाठीमागुन कोणीतरी अज्ञात व्यक्तिनी माझे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र कापुन चोरुन नेले आहे
अशी माझी खात्री झाली असल्याने मी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत