शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डीत साई संस्थानच्या एका सुरक्षारक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या शिर्डी व परिसरात सुरू आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गेल्या सहा दिवसापूर्वी साई संस्थानचे सुरक्षा रक्षक संदिप वाणी यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून तो मृत्युशी झुंज देत आहे.
संदिप साहेबराव वाणी (रा. नांदुर्खी, ता. राहाता) हा एमएसएफ या सुरक्षा एजन्सीचा सुरक्षा रक्षक असून तो २०० रुम साईनाथ हॉस्पिटल येथे ड्युटीस होता. पाच दिवसांपूर्वी तो नांदुर्खी येथे विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला असता नातेवाईकांनी व भावाने त्यास गंभीर अवस्थेत साईबाबा सुपर हॉस्पीटलमध्ये दाखल केले.
तो डेंजर झोनमध्ये गेल्याने तेथील डॉक्टरांनी शतीर्च प्रयत्न केले. शिर्डी पोलीसांनी त्याचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची परिस्थिती गंभीर असल्याने जबाब नोंदवता आला नाही. आता सध्या तो अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान वाणी यांनी विष प्राशन का केले?
त्यास काय त्रास होता? कामावर त्यास कुणी त्रास देत होते का? की अजून काही कारणाने त्याने विषप्राशन केले याचा छडा तो शुद्धीवर आल्यावर लागणार आहे.
मात्र सध्या तरी उलट सुलट चर्चा संस्था कर्मचारी तसेच नागरिकांमधून होत आहे. सध्या ग्रो मोर ट्रेडिंग कंपनी संदर्भातही शिर्डीत मोठी चर्चा होत असून अनेकांनी कर्ज काढून आपली जनावरे ,दागिने, विकून या शेअर्स ट्रेडिंग कंपनीमध्ये पैसा गुंतवला आहे .मात्र आता पैसे मिळत नसल्यामुळे अनेक जण चिंताग्रस्त झाले आहेत.
गुंतवणूकदार मोठ्या संकटाला तोंड देत आहेत. अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीतून गुंतवणूकदार जात असल्यामुळे काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीही चर्चा खाजगीमध्ये शिर्डीत ऐकू येत आहे. या प्रकारामुळे तर नाही ना या सुरक्षारक्षकाने असा प्रयत्न केला अशीही चर्चा शिर्डीत सध्या होत आहे. तरी हा सुरक्षारक्षक सध्या उपचार घेत असून तो क्लिअर झाला तर त्याच्याकडून सर्व माहिती मिळेल अशी आशाही बोलून दाखवली जात आहे.