Letest News
शिर्डीत ‘गणेश गॅस एजन्सी’चा काळाबाजार उफाळला रांगेत श्रीमंतांना मागच्या दाराने सिलेंडर – प्रशासन झोप... मध्यरात्री दरोड्याने थरकाप-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची दमदार कामगिरी – आंतरजिल... शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण!
क्राईमशिर्डी

तेलंगणा व आंध्रप्रदेशातील साईभक्तांकडून शिर्डीच्या साई संस्थांनला पाच साईशिल्पांची अनमोल भेट!

शिर्डी (प्रतिनिधी) देश-विदेशातील लाखो साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री साईबाबा संस्थानला आज एक अनोखी भेट प्राप्त झाली. दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील पाच साईभक्त कुटुंबांनी आपली नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त करत श्री साईबाबांची वेगवेगळी पाच शिल्प श्री साईबाबा संस्थानला दान दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या शिल्पांचे अनावरण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, (भा.प्र.से.) आणि संबंधित देणगीदार साईभक्तांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, सहाय्यक अभियंता स्वप्निल गायकवाड, मॅकेनिकल विभागप्रमुख अतुल वाघ, श्री साईप्रसाद निवासस्थान विभागप्रमुख प्रविण मिरजकर यासह संस्थानचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पाचही शिल्पे कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना असून संस्थानच्या विविध ठिकाणी ही शिल्‍पे बसविण्यात आली आहेत. हैद्राबाद, तेलंगाणा येथील श्री के. मोहन रेड्डी आणि श्रीमती के. श्रीदेवी यांनी दान दिलेले दगडावर बसलेले साईबाबांचे शिल्प व सिकंदराबाद, तेलंगाणा येथील श्री प्रकाश चन्नावर व श्रीमती गीता चन्नावर यांचे लोडवर टेकून बसलेले साईबाबांचे शिल्प नवीन दर्शन रांगेत स्थापन करण्‍यात आले.

कोरुतला व्हिलेज, तेलंगाणा येथील श्री ए. वेणुगोपाल व श्रीमती ए. शोभा यांचे दगडावर बसून आशिर्वाद देणारे साईबाबांचे शिल्प नवीन शैक्षणिक संकुलात ठेवण्यात आले. विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश येथील श्री जी. श्रीनिवास व श्रीमती जी. श्रद्धा यांचे फळीवर निद्रावस्थेत असलेले साईबाबांचे शिल्प द्वारावती भक्तनिवासात ठेवले गेले.

तर, हैद्राबाद, तेलंगाणा येथील श्रीमती ए. माया व श्री ए. बाबूराव यांनी दिलेले द्वारकामाईत बसलेले साईबाबांचे शिल्प श्री साई आश्रम भक्तनिवासात प्रतिष्ठापित झाले.


या प्रसंगी साईभक्तांचे भावपूर्ण योगदान आणि संस्थान प्रशासनाची नियोजनबद्धता यांचा उत्तम समन्वय दिसून आला. श्रद्धा व भक्तीचे प्रतीक असलेली ही शिल्पे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवी आध्यात्मिक अनुभूती देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button