शिर्डीत साळवे कुटुंबियांनी कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतांना निघोज येथील चंद्रकांत बाबुराव मते यांना बँकेची सेटलमेंट करुंन देतो त्यासाठी पैशे घेतले आणि सेटलमेंट करून दिली नाही म्हणून मते यांनी फसवणूक करणाऱ्या खर्डे यांच्याकडे पैश्यांची मागणी केली असता पैशे देण्यास टाळाटाळ केल्याने मते यांनी खर्डे यांच्यावर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे मते यांनी फिर्यादीत म्हटले आहे कि
माझ्यावर बँक ऑफ बडोदा या बँकेचे कर्ज असुन ते कर्ज मी फेडत होतो. परंतु पुर्ण रक्कम माझ्याकडे नसल्याने मी माझा मित्र विशाल पाटील याचेशी चर्चा केली असता त्याने मला सांगितले की, शंतनु आनंदराव खर्डे रा.धांमणगाव दत्तपुर ता. जि. अमरावती हा बँक सेटलमेंटचे कामे करतो असे मला समजले. विशाल पाटील यांनी जानेवारी 2024 मध्ये शंतनु आनंदराव खर्डे यांचेशी संपर्क साधुन सर्व गोष्टी त्यांचे कानावर घातले असता शंतनु आनंदराव खर्डे यांनी पुण्यात भेटुन
कर्जाची सर्व कागदपत्रे घेवुन आम्हाला 85 लाख रूपयात सर्व लोन सेटल करून देतो असे सांगितले त्यापैकी 650000/- रूपये बँक ऑफिसर यांना अॅडव्हान्स दयावा लागेल असे सांगितल्याने आम्ही त्यास पुणे येथे 2024 प्रथम 300000/- रूपये रोख स्वरूपात दिले. व त्या बदल्यात त्याने HDFC बँकेचा 300000/- रूपये चेक नंबर 000032 दिनांक 27/02/2024 रोजी दिला.
व त्यानंतर त्याच महीण्यात परत बँकेच्या तीन ऑफिसरला पैसे देणे असुन रुपये 350000/- रुपये दयावे लागतील. असे सांगुन सदर रक्कम फोन पे व्दारे व बँक ऑफ इंडिया व माझ्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातुन RTGS व्दारे दिले. परंतु दोन दिवसात सेटल करून देतो असे सांगुन आज पावेतो कुठल्याही बँक लोन सेटल करून न देता माझे पैसे परत देण्यास टाळाटाळ करून माझी फसवणुक केली आहे.
मी वारंवार त्यांचेशी फोनव्दारे संपर्क केला असता व पाटपुरावा केला असता आज उदया अशी उडवा-डडवीची उत्तरे देणे चालु केले. सदर व्यक्तीने दिलेला चेक त्याचे सांगण्यावरून बँक ऑफ इंडीया शिर्डी शाखा येथे भरला असता तो चेकही बाउंन्स झाला आहे. त्यानंतर वारंवार शंतनु खर्डे यास मी माझे पैसे मागितल्याने त्याने 250000/- रूपये 03/06/2024 रोजी दिले.
व उरलेले 400000/-रूपये मला दिले नाही. आज पावेतो मी वेळोवेळी माझे पैश्याची मागणी केली असता तो पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. म्हणुन माझी खात्री झाली की, शंतनु आनंदराव खर्डे रा. धामनगाव दत्तपुर ता.जि. अमरावती याने माझा विश्वास संपादन करुन माझी 4,00,000/- रुपयांची माझी फसवणूक केली आहे खर्डे याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शणाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत