
शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले त्यात ७ वर्षात मिसिंग झालेल्या लोकांची शोध मोहीम राबवण्यात आली

त्यात पन्नास जण मिळून आले एका दिवसात प्रलंबित मिसिंग फाईल बंद करण्यात आली त्याबरोबरच गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली त्यात रंगनाथ युवराज काळे वय ३६ रेणुका नगर श्रीरामपूर, साबीर दिलावर शेख व २४ गोंधवणी रोड श्रीरामपूर, राहुल हिरामण गायकवाड चास ता सिन्नर ,यांचा समावेश आहे
त्याबरोबरच ३२ अजामीन पात्र वाॅरटची बजावणी देखील करण्यात आली त्यात ७ पुरुष ३महिला यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले त्यात आकाश चंदूसिंग परदेशी राहणार सावळीविहीर, अनिल रघुनाथ कचरे राहणार सावळीविहीर,राजू कैलास वासंडे सावळीविहीर, विशाल उर्फ राजू कैलास वासंडे सावळीविहीर ,कुमार बाळासाहेब गायकवाड शिर्डी, अमोल देविदास वाघ सावळीविहीर, यांचा समावेश आहे तसेच राहता न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या १२४ समन्सची बजावणी करण्यात आली
त्याबरोबरच दारूबंदी कायद्याअंतर्गत दोन केसेस दाखल करून १८४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यात युवराज भागीरथ गव्हाणे रा पिंपळवाडी, किसन माधव पटेल राहणार म्हसोबा नगर शिर्डी, या दोघांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
सदरच्या कारवाईत शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे, सपोनी भारत बलैया, सपोनी अमित वाळके, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे व जवळपास ३० पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला होता

