शिर्डी प्रतिनिधी / सकाळी १० वाजेच्या सुमारास मी द्वारावती भक्तनिवास शिर्डी येथे गेटजवळ मी नेहमीप्रमाणे माझे प्रवासी वाहनात प्रवासी भरत असताना इसम नामे संकेत गव्हाणे हा तेथे आला व मला म्हणाला तु गणपती वर्गणीचे फक्त 500 रु. का दिले जास्त का दिले नाही असे म्हणाला त्यावर मी त्याला माझी ऐपत एवढेच पैसे देण्याची आहे
असे बोलण्याचा त्याला राग आल्याने त्याने मला शिवीगाळ केली व हातातील कड्याने माझ्या डोक्यावर मारले. तेव्हा माझे डोक्यातून रक्त येत होते. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो असता पोलीसांनी मला औषधोउचार करणेसाठी पत्र दिले त्यानंतर मी उपचार घेवुन शिर्डी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो आहे.
सुमारास द्वारावती भक्तनिवास शिर्डी येथे गेटजवळ तु गणपती वर्गणीचे फक्त ५०० रु. का दिले जास्त का दिले नाही, त्यावर मी त्याला माझी ऐपत एवढेच पैसे देण्याची आहे असे बोलण्याचा त्याला राग आल्याने संकेत गव्हाणे याने शिवीगाळ करुन हातातील स्टीलसारख्या रंगाचा दिसणारा कड्याने माझ्या डोक्यावर मारून मला जखमी केले.
म्हणुन सुनिल संतोष पाटील वय ३४ रा शिर्डी यांनी संकेत गव्हाणे रा.शिर्डी याचेविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर शिर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),३८२ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपासणी पोलीस करीत आहे