कोपरगाव (प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे पालन पोषण व सांभाळ न करता तसेच शेतातील पाणी बंद का केल्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केल्याने वडिलांनी आपली मुलगी, जावई नातू यांच्याविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील आनंदा दादा देवकर या वयोवृद्ध व्यक्तीने कोपरगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की,
मी तसेच पत्नी बबुबाई मुलगी जानका नातु योगेश व कुनाल असे एकत्र राहणेस असुन मी जेष्ठ नागरीक असल्याने माझा सांभाळ, पालन पोषन व दवाखान्याचा खर्च करावा यासाठी मी माझे दोन्ही मुली जानका, कांता यांचे नावावरती सव्वा सव्वा एकर जमीन बक्षीस पत्र म्हणुन नावावरती केली होती
परंतु माझी एकच मुलगी जानका ही माझे पानल पोषन करते. दुसरी मुलगी कांता शेजारीच राहणेस असुन ती माझेशी नेहमी भांडण करत असते.
दि.4/5/2025 रोजी दुपारी 2.00 वा चे सुमरास मी घरी असतांना ।) मुलगी कांता आनंदा देवकर, 2) जावई- दत्तात्रय जगन्नाथ काळे, 3) नातु संकेत रामदास काळे 4) नातु ओमकार दत्तात्रय काळे अशांना मी शेतातील पाणी का बंद केले याबाबत विचारणा केली असता
याचा त्यांना राग आल्याने त्यांनी मला विनाकारण शिवीगाळ करुन माझे कपडे फाडुन हाताचे चापटाने मारहान करुन तुला दाखवतो असे म्हणत धमकी दिली.अशी फिर्याद त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिली
असून कोपरगाव शहर पो.स्टेला 223/ 2025 नुसार ज्येष्ठ नागरिकांनी पालक यांचे 24 पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 कलम 115 (2) 3 (5) 351 (2) आदी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास कोपरगाव पोलीस करत आहेत.