

शिर्डी ( प्रतिनिधी )शिर्डीतील हॉटेल शिर्डी पार्क इन मिनी पंजाब रेस्टॉरंटचे अनाधिकृत बांधकाम न पाडता आर्थिक तडजोड करत असल्याची शंका असल्याने या अतिक्रमण धारकास पाठीशी घालणारे शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सतिश दिघे यांच्यावर खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी या निवेदनात म्हटले की,
शिर्डी नगर परिषदेच्या हद्दीत पिंपळवाडी रोडवर हॉटेल शिर्डी पार्क इन् मिनी पंजाब रेस्टोरंटचे अनधिकृतपणे नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम केलेले आहे. त्या हॉटेल मालकाला नगर परिषदेने सन २०१९ साली ३ वेळेस अनधिकृत बांधकाम पाडण्याची लेखी नोटीस दिलेली होती.
तरीही त्या हॉटेल मालकाने ते अतिक्रमण काढले नाही. त्यावेळी मी ते अतिक्रमण पाडावे म्हणून शिर्डी नगर परिषदेच्या समोर ५ दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावेळी हेच श्री.सतीश दिघे मुख्याधिकारी होते. माझे उपोषण सोडवतांना नगर परिषदेने मला लेखी दिले होते कि,
सदर हॉटेल मालकाचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचे आदेशाने पुढील कारवाई करण्यात येईल आणि तो दावा २०२४ मध्ये न्यायालयाने फेटाळून लावला आणि निकाल नगरपंचायतच्या बाजूने लागला होता म्हणून मी दिनांक १७/०२/२०२५ रोजी संबंधित विभागांना ते अतिक्रमण पाडावे म्हणून अर्ज दिला होता.
तरी ते अतिक्रमण निघाले नाही. मी दिनांक २८/०२/२०२५ व दिनांक ०१/०३/२०२५ रोजी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सतीश दिघे साहेबांशी त्या अतिक्रमणाबाबत चर्चा केली असता त्यांनी मला लेखी कळवले की ,संबंधित अतिक्रमणाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल परंतु कधी निर्णय घेणार हे सांगितले नाही याचे कारण असे आहे कि त्या हॉटेल मालकाला काही अवधी द्यायचा म्हणजे तो पुन्हा न्यायालयात जाऊन दावा दाखल करेल.
हे अतिक्रमण पाडू नये यासाठी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे संबंधित हॉटेल मालकाशी आर्थिक व्यवहार झालेले असल्याची मला शंका झालेली आहे . कारण सन २०१९ सालीही हेच मुख्याधिकारी होते आणि आताही तेच श्री. सतीश दिघे मुख्याधिकारी आहेत. त्यांनी या प्रकरणी आर्थिक तडजोड करत अतिक्रमण धारकाला पाठबळ दिल्याचा मला संशय आहे. तेव्हा शिर्डी न.पा.चे मुख्याधिकारी दिघे यांच्या कारकीर्द बाबत आपल्या कार्यालय मार्फत आर्थिक देवाण घेवाणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
अशी मागणी जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी या निवेदनातून करण्यात आली असून हे निवेदन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहिल्यानगर, आदींनाही पाठवण्यात आले आहे. . अशी मागणी जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी या निवेदनातून केली आहे
