Letest News
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण 80,83,464/- रुपय... पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्... मागील भांडणाच्या कारणावरून एका कुविख्यात गुंड्याने केले गोळीबार श्रीरामपूर शहर हादरले  थायलंड येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये शिर्डी चा निलेश वाडेकर याने मिळवले ब्रांझ मेडल कोट्यावधिचे मुद्देमाल जप्त करत नगर गुन्हे अन्वेषण पथकाने केली कामगीरी भारी !! शरद पवारास जिल्हाधिकारी साहेबांचा चांगलाच हिसका ! शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर देह व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी केले चार हॉटेल सील हॉटेल् सील झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ
क्राईमशिर्डी

शिर्डी येथील साई कॉम्प्लेक्स जवळ एकाच्या डोक्यात कोयत्याने वार शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल  

शिर्डी प्रतिनिधी शिर्डी शहरातील योगेश कैलास घोडके राहणार लक्ष्मीनगर  साईबाबा हॉस्पीटल शिर्डी येथे डिलक्स स्पेशल रुम नंबर 10 मध्ये अॅडमीट असतानाफिर्याद दिली कि , मी वरील ठिकाणी घरात आई संगिता, वडिल कैलास असे एकत्र रहातो व मोल मजुरी करुन पोट भरतो.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दिनांक 03/06/2025 रोजी 10/00 वा. (रात्री) मी व माझा मित्र गौतम प्रमोद खंडिझोड असे आम्ही साई कॉम्प्लेक्स जवळ उभे असताना मला माझा मित्र प्रविण वामन चंद्रिका मो नं 9021227490 वरुन फोन आला की, तुम्ही कोठे आहात, असे विचारले असता आम्ही त्यास सांगितले की,

आम्ही साई कॉम्प्लेक्स समोर आहे. त्यावर त्यांनी सांगितले की, मला हॉटेल वृंदावन समोर 1) करण आव्हाड, 2) निलेश मोकळ 3) दिनेश मोकळ 4)
आकाश मोकळ 5) आयान शेख असे मला मोटार सायकल काढण्याचे किरकोळ कारणावरुन ते मला मारहाण करत आहेत, असे कळविल्यावरुन मी व माझा मित्र गौतम खंडिझोड असे ताबडतोब तेथे गेलो व तेथे जावुन आम्ही वरील पाचही लोकांना समजावुन सांगुन त्यांचे भांडण मिटविले.

त्यानंतर वाद मिटल्याने आम्ही तिघेजन शिर्डी गावात साई कॉम्प्लेक्स समोर नॅचरल आईस्क्रीम दुकानासमोर पावभाजीचे दुकानाचे बाजुला उभे असताना मला करण आव्हाड याचा फोन आला की, तुम्ही आत्ता सध्या कोठे आहात, मी त्यास म्हणालो की, आम्ही सध्या साई कॉम्प्लेक्स समोर उभे आहोत, असे सांगितलेवर तो मला म्हणाला की,

तुला आम्हाला भेटायचे आहे असे म्हटल्यावर तो वरील पाच जण सदर ठिकाणी रात्री 11 वाजेचे सुमारास तेथे आले त्यावेळी 1) करण आव्हाड, 2) निलेश मोकळ 3) दिनेश मोकळ 4) आकाश मोकळ 5) आयान शेख यांच्या हातात लाकडी दांडा असे हातात हत्यार घेवुन ते आमचे जवळ आले व आम्हाला तिघांना पाहताच करण आव्हाड व निलेश मोकळ यांनी माझे डोक्यात कोयत्याने वार केले

व माझा मित्र गौतम खंडिझोड याच्या डोक्यातसु‌द्धा दोघांनी कोयत्याने वार केले व दिनेश मोकळ याने त्याच्या हातातील लोखंडी रोडने मला डावे हातावर व मित्र गौतम खंडिझोड याचे डावे हातावर मारहाण केली. तसेच आकाश मोकळ व आयान शेख यांनी हातातील लाकडी दांड्‌याने मला व मित्र गौतम खंडिझोड तसेच प्रविण चंद्रिका यांना लाकडी दंड्याने मारहाण केली व शिवीगाळ करुन तुम्हाला जीवे ठार मारतो अशी धमकी दिली.

व तुमचा काटाच काढुन टाकतो, तुम्ही आम्हाला निट ओळखले नाही, आम्हाला मारहाणीत डोक्यात हातावर लागुन जखमा झाल्याने आम्ही चक्कर येवुन खाली पडलो. त्यानंतर मित्र प्रविण चंद्रिका याने इतर मित्रांना व नातेवाईकांना फोन केल्याने वरिल सर्व आरोपी तेथुन निघुन गेले.

त्यानंतर आम्हाला मित्र व नातेवाईक यांनी श्री. साईबाबा हॉस्पीटल शिर्डी येथे औषधोपचारकामी अॅडमिट केले आहे. अशी आशयाची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली आहे पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button