Letest News
राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीच्या वेळेत बदल श्रावण सोमवारी सायंकाळी ६ वाजताच धुपारती चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ! दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख...
क्राईमशिर्डी

साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली

शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या दर्शनासाठी कर्नाटक राज्यातून शिर्डीत आलेल्या एका साईभक्त कुटुंबावर काळाने घाला घातला. आदर्श शाळेजवळ रस्ता ओलांडत असताना अवघ्या चार वर्षीय कु. कृतिका मेघवाल हिला ट्रॅव्हल्स बसची जोरदार धडक बसल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण साईनगरीत हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी मेघवाल कुटुंब साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. आदर्श शाळेजवळ कुटुंबीयांसह रस्ता ओलांडत असताना ४० सीटर साई गौरी ट्रॅव्हल्स बसने चिमुकलीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कृतिका गंभीर जखमी झाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस कर्मचारी संदीप उंदावत व पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चिमुकलीला तातडीने साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर रुग्णालयात मुलीच्या आई-वडिलांचा आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. साईदर्शनासाठी आनंदाने आलेल्या कुटुंबावर एका क्षणात दु:खाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.
दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी संबंधित ट्रॅव्हल्स बस ताब्यात घेतली असून रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर शिर्डीत येणाऱ्या भाविकांनी विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी त्यांचा हात सोडू नये आणि रस्ता ओलांडताना अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button