Letest News
वारंवार तेच आरोपी-तरीही धंदा सुरूच? कल्याणनंतर शिर्डीची पाळी? अवैध देहव्यापाराच्या रॅकेटवर कठोर कारव... रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र निवड समितीवर डॉ. सुरेश हावरे यांची नियुक्ती शिर्डीत शस्त्रतस्करांना पोलिसांचा दणका-स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ-भंडारदरा ४३ टक्क्यांवर निळवंडेतही समाधानकारक पाणीसाठा शिर्डीत 'चिल्लर गँग'चा धुमाकूळ! भाविकांचे मोबाईल-रोकड- पिशव्या लंपास-मध्यरात्री साईनगरीत अल्पवयीन टो... मुसळधार पावसाचा रेड अलर्ट-नदीकाठच्या गावांनी तातडीने सतर्क राहावे! शिर्डीच्या ६ गुन्हेगारांसह ६८ सराईत आरोपी तडीपार श्रीरामपूर विभागाची गुन्हेगारीवर मोठी कारवाई अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्...
क्राईमशिर्डी

शिर्डीत शस्त्रतस्करांना पोलिसांचा दणका-स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

शिर्डी | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणारे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत गावठी पिस्टलसह चार जणांना अटक केली. या कारवाईत एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल, रोख रक्कम आणि इर्टिगा कार असा एकूण ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, वाकडी–श्रीरामपूर मार्गावरून इर्टिगा (एमएच ४८ एके ७७६३) या वाहनातून काही जण गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाकडी रोडवरील यशवंत बाबा चौक व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात सापळा रचला. संशयित वाहन थांबवून त्यातील चौघांना ताब्यात घेण्यात आले.

DN SPORTS

kamlakar

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सागर दत्तू उपळकर (२८, चालक), विशाल रामकिसन गुंजाळ (२६), ऋतिक भगवान गुंजाळ (२५) आणि पवन गोरख उपळकर (२७, सर्व रा. रामपूर, ता. श्रीरामपूर) अशी आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी सदरचे अग्निशस्त्र मध्य प्रदेशातून खरेदी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईत आरोपींकडून ४० हजार रुपये

किमतीचे गावठी पिस्टल, ४ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, ५१ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, रोख रक्कम आणि ५ लाख रुपये किमतीची इर्टिगा कार असा एकूण ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस अंमलदार रमिजराजा रफीक आत्तार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट कलम ३ व ७/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच फरकान शेख, रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, रमिजराजा आत्तार, भगवान आत्तार, भगवान थोरात आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button