Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

“साईचरणी ९२ लाखांचा सुवर्ण मुकुट… भक्तीसमोर सोन्यालाही तेज!”

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. “सबका मालिक एक” हा साईबाबांचा संदेश मनामनांत जपत भक्तगण आपल्या श्रद्धेनुसार साईचरणी सेवा आणि दान अर्पण करत असतात. याच भक्तिभावातून आज दि. २९ मे २०२६ रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील साईभक्त श्री. गोविंद गोयल यांनी श्री साईबाबांच्या चरणी ७८० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण करून आपल्या भक्तीची सुवर्णमयी साक्ष दिली.
या सुवर्ण मुकुटाची किंमत तब्बल ९२ लाख ०५ हजार ५६० रुपये इतकी असून, हा मुकुट केवळ सोन्याचा दागिना नसून साईभक्तांच्या अथांग श्रद्धेचे आणि निस्सीम प्रेमाचे प्रतीक ठरला आहे. मुकुटावरील सुंदर नक्षीकाम, त्याची भव्यता आणि साईप्रेमातून केलेले हे समर्पण पाहून उपस्थित भाविकही भारावून गेले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


साईबाबांच्या दरबारात श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद नसतो. येथे प्रत्येक भक्त आपल्या भावना, विश्वास आणि भक्ती अर्पण करतो. कुणी अन्नदान करतो, कुणी सेवा देतो, तर कुणी अशा प्रकारे अमूल्य दान करून साईचरणी कृतज्ञता व्यक्त करतो. श्री. गोविंद गोयल यांनी अर्पण केलेला हा सुवर्ण मुकुट भाविकांच्या साईप्रेमाची आणखी एक हृदयस्पर्शी कहाणी ठरली आहे.
यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दानशूर साईभक्त श्री. गोविंद गोयल यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. संस्थानच्या वतीने त्यांच्या भक्तीभावाचे कौतुक करण्यात आले.
“साईसमोर नतमस्तक होताना भक्त फक्त आपली श्रद्धा अर्पण करतो… आणि साईबाबा त्या भक्तीला आशीर्वादाचे सुवर्ण रूप देतात,” अशी भावना अनेक साईभक्तांनी व्यक्त केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button