Letest News
शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!”
राजकीयशिर्डी

शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा

शिर्डी येथे सामाजिक बांधिलकी जपत साई संगम सेवाभावी संस्था, शिर्डी आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे संस्थेचे सलग ९ वे शिबिर असून अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हे शिबिर आशेचा किरण ठरणार आहे.
रविवार दि. २४ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हॉटेल साई संगम, वॉटरपार्क जवळ, शिर्डी येथे हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात अनुभवी नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करण्यात येणार असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची निवड करून त्यांच्यावर पुढील मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


आजच्या धावपळीच्या जीवनात डोळ्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक नागरिकांना दृष्टीदोष, मोतीबिंदू व इतर नेत्रविकारांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना महागड्या उपचारांमुळे वेळेवर उपचार घेणे शक्य होत नाही. हीच गरज ओळखून साई संगम सेवाभावी संस्थेने सामाजिक उपक्रमातून मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे.
या उपक्रमासाठी मा. संदिप भाऊ सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी आधारकार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स प्रत तसेच पूर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे. शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांची राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था मोफत करण्यात येणार असल्याने गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
साईनगरीत सातत्याने सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवून अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. या शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना नवदृष्टी मिळणार असून समाजसेवेचा एक आदर्श उपक्रम म्हणून या शिबिराकडे पाहिले जात आहे.
संपर्क : ९८२३४२०७६५ / ९०११११३३४४

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button