Letest News
राहत्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! पीआय सरोदे यांच्यासमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान लक्ष्मी नगरच्या विकासकामांना गती- ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी उपाययोजनेचा शुभारंभ “इतना सन्नाटा क्यूँ छाया है…?” खरात प्रकरणात नेमकं कोणाला वाचवलं जातंय? समता पतसंस्थेतील व्यवहारांवर... राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद”
अ.नगरक्राईम

राहत्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! पीआय सरोदे यांच्यासमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान

राहता पोलीस ठाण्यात नूतन पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी पदभार स्वीकारताच नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र त्यांच्या समोर आता राहता शहरातील वाढत्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शहरात खुलेआम सुरू असलेले गुटखा तस्करी, पत्त्यांचे क्लब, मटका-जुगार, गांजा विक्री, काळे-पिवळे आणि “बिंगो”सारखे अवैध धंदे गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गुटखा तस्कर म्हणून चर्चेत असलेले बंटी आणि खाबिया यांच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीचे जाळे कार्यरत असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत पत्त्यांचे अड्डे, मटका आणि जुगार खुलेआम सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. या अवैध धंद्यांतून मिळणाऱ्या पैशातून शहरात गुन्हेगारी वाढत असून अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात असल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.


राहत्यात गांजा विक्री आणि अवैध जुगारामुळे चोरी, मारामाऱ्या, दहशत आणि टोळक्यांची मुजोरी वाढल्याचा आरोपही नागरिक करत आहेत. काही भागांत काळे-पिवळे आणि “बिंगो”च्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध प्रकारांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. “हरामाच्या कमाईतून गुन्हेगारीचे साम्राज्य उभे राहत आहे आणि युवकांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया आता नागरिक देत आहेत.नागरिकांच्या मते, राहत्यातील हे सर्व अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद झाले तर शहरातील वाढती गुन्हेगारी आपोआप कमी होऊ शकते.

त्यामुळे नूतन पीआय सरोदे यांनी धडक कारवाई करून गुटखा माफिया, जुगार अड्डे, गांजा विक्रेते आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता नूतन पोलीस निरीक्षक सरोदे हे या अवैध साम्राज्यावर कितपत वचक निर्माण करतात, याकडे संपूर्ण राहता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button