Letest News
राहत्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! पीआय सरोदे यांच्यासमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान लक्ष्मी नगरच्या विकासकामांना गती- ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी उपाययोजनेचा शुभारंभ “इतना सन्नाटा क्यूँ छाया है…?” खरात प्रकरणात नेमकं कोणाला वाचवलं जातंय? समता पतसंस्थेतील व्यवहारांवर... राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद”
अ.नगरक्राईम

“इतना सन्नाटा क्यूँ छाया है…?” खरात प्रकरणात नेमकं कोणाला वाचवलं जातंय? समता पतसंस्थेतील व्यवहारांवरून संशय अधिक गडद

अशोक खरात प्रकरण उघड झाल्यानंतर सुरुवातीला ज्या वेगाने पोलिसांची आणि तपास यंत्रणांची धावपळ सुरू होती, ती पाहून जनतेला वाटलं होतं की आता मोठमोठे चेहरे उघडे पडणार, काळ्या पैशांचं साम्राज्य समोर येणार आणि पीडित महिलांना न्याय मिळणार. पण आज परिस्थिती उलटी दिसतेय. तपास सुरू आहे म्हणणारे अधिकारी आहेत, SIT आहे, ED आहे, IT आहे… पण कारवाई कुठे आहे?
अशोक खरातला ताब्यात घेतलं. PCR घेतली. चौकशी झाली. काका कोयटे यांच्यासह अनेकांना चौकशीसाठी बोलावलं. समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांची चर्चा राज्यभर झाली. शेकडो खात्यांमध्ये कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे आरोप झाले. समान कागदपत्रे वापरल्याची चर्चा झाली. मग एवढ्या मोठ्या प्रकरणात अजूनही एकही मोठा गुन्हा का दिसत नाही?
जनतेच्या मनात आता स्पष्ट संशय निर्माण झाला आहे —

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


नेमके पोलीस कोणाला पाठीशी घालत आहेत?
जर व्यवहार बोगस नव्हते, तर तपास यंत्रणांनी जाहीरपणे सांगावं.
आणि जर व्यवहार संशयास्पद होते, तर संबंधित अधिकारी, खातेदार आणि सूत्रधार अजून मोकाट का फिरत आहेत?
आज सामान्य माणूस छोट्या व्यवहारात अडकला तरी त्याच्या घरावर धाडी पडतात. खाते गोठवलं जातं. चौकशीचे फेरे सुरू होतात. मग येथे कोट्यवधींची चर्चा असताना एवढी शांतता का?


ही शांतता संशय वाढवणारी आहे.
अशोक खरात हा फक्त एक चेहरा होता का? त्याच्या मागे राजकीय, आर्थिक आणि प्रशासकीय संरक्षणाची भक्कम भिंत उभी होती का? काका कोयटे यांची चौकशी झाली, पण त्यातून निष्पन्न काय झालं? चौकशी म्हणजे कारवाई नसते. जनतेला आता “चौकशी सुरू आहे” हे जुने वाक्य नकोय… जनतेला उत्तर हवंय!
आज परिस्थिती अशी झाली आहे की,
“सुरुवातीला वाघासारखी गर्जना… आणि आता संशयास्पद शांतता!”
तपास यंत्रणा खरंच सत्य शोधत आहेत की वेळ मारून नेत आहेत?
मोठी नावं समोर येऊ नयेत म्हणून फाईली दाबल्या जात आहेत का?


राजकीय दबावाखाली तपासाची धार बोथट झाली आहे का?
हे प्रश्न आता सोशल मीडियावरच नाही तर गावागावात चर्चिले जात आहेत.
सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे — ज्या महिलांनी पुढे येऊन गंभीर आरोप केले, त्यांचं काय? त्यांना न्याय मिळणार की हे प्रकरणही इतर हायप्रोफाईल प्रकरणांसारखं “गुलदस्त्यात” जाणार?
आज महाराष्ट्रातील जनता पोलिसांकडे संशयाने पाहू लागली आहे. कारण कारवाईपेक्षा शांतता जास्त दिसतेय.
आणि ही शांतता सामान्य नाही…
“तेरी भी चूप… मेरी भी चूप… तो फिर बोलता कौन?”
जर खरंच तपास निष्पक्ष असेल, तर निष्कर्ष जनतेसमोर मांडा.
दोषी कोण ते सांगा.
कारवाई करा.
नाहीतर उद्या जनतेच्या मनात एकच निष्कर्ष पक्का होईल —
“खरात एकटा नव्हता… त्याला वाचवणारी संपूर्ण व्यवस्था होती!”

………..: समता पतसंस्थेतील व्यवहारांवरून संशय अधिक गडद
शेकडो खात्यांमधील संशयास्पद व्यवहार, समान कागदपत्रांची चर्चा, कोट्यवधींच्या उलाढालीचे आरोप… पण अजूनही मोठी नावे मोकाट का? सामान्य माणसाच्या छोट्या व्यवहारावर धाडी पडतात, मग येथे एवढी शांतता का?
┗━━━━━━━━━━━━━━━━━━┛
┏━━━━━━━━━━━━━━━━━━┓
🕵️ “चौकशी सुरू आहे” की फाईली दाबल्या जात आहेत?
काका कोयटे यांच्यासह अनेकांची चौकशी झाली, पण निष्पन्न काय? जनतेच्या मनात आता प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत — तपास खरंच निष्पक्ष आहे का? की राजकीय आणि प्रशासकीय दबावाखाली प्रकरणाची धार बोथट झाली आहे?
┗━━━━━━━━━━━━━━━━━━┛
┏━━━━━━━━━━━━━━━━━━┓


🚨 घार्गे आणि सातपुते यांच्या बदलीने संशय आणखी वाढला!
त्यातच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अश्विनी सातपुते यांची तडकाफडकी बदली झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “नेमक्या कारवाईच्या टप्प्यावरच बदल्या का?” असा सवाल आता गावागावात चर्चिला जात आहे.
[15:13, 17/5/2026] ………..: कारवाई करणाऱ्यांचीच बदली… मग नेमकं कोण घाबरलं?” 🚨
अशोक खरात प्रकरणात तपासाची दिशा बदलत असतानाच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अश्विनी सातपुते यांची झालेली तडकाफडकी बदली आता जनतेच्या संशयाला अधिक खतपाणी घालत आहे.
ज्या अधिकाऱ्यांच्या काळात मोठी नावं चर्चेत आली, संशयास्पद व्यवहार उघडकीस आले, चौकशा सुरू झाल्या… त्याच अधिकाऱ्यांना अचानक हटवण्यामागे नेमकं कारण काय?
ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया आहे, की कुणाला वाचवण्यासाठी आखलेली “व्यवस्थेतील शांत खेळी”?
आज जनतेच्या मनात एकच सवाल घुमतोय —
“तपास थांबवण्यासाठीच बदल्या करण्यात आल्या का?”

अहिल्यानगर जिल्ह्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक आर्थिक व्यवहार समोर येऊ लागले आहेत. कोपरगाव येथील समता पतसंस्थेमध्ये तब्बल ६५ बनावट खाती उघडून केवळ चार ते पाच दिवसांत २०० हून अधिक व्यवहारांद्वारे सुमारे ५२ कोटी रुपये फिरवल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे या खात्यांमध्ये महसूल विभागातील अधिकारी, आरटीओ विभागातील कर्मचारी तसेच काही प्रतिष्ठित कुटुंबीयांच्या नावांचाही वापर झाल्याची चर्चा रंगली आहे.


“१.९९ लाखांची ट्रिक वापरून कोट्यवधींची उलाढाल”
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, जानेवारी महिन्यात अवघ्या काही दिवसांत विविध खात्यांतून वारंवार १ लाख ९९ हजार रुपयांचे व्यवहार करण्यात आले. बँकिंग व्यवस्थेतील २ लाखांच्या मर्यादेची पळवाट शोधून संशय टाळण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे. एकाच दिवशी अनेक खात्यांतून एकाच रकमेचे व्यवहार झाल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
“सर्व खात्यांचा सूत्रधार स्वतः खरात?”
चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, या सर्व खात्यांचा नॉमिनी आणि व्यवहार नियंत्रक म्हणून अशोक खरातचे नाव पुढे येत आहे. अनेक खाती एकाच पद्धतीने हाताळली गेल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे. केंद्रीय यंत्रणांकडून संबंधित खातेदारांची चौकशी सुरू असून, पैशांचा मूळ स्रोत आणि लाभार्थी कोण याचा तपास वेगाने सुरू आहे.


“अटकेआधी विदेशात पळण्याची तयारी?”
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस कारवाईची चाहूल लागताच अशोक खरातने न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पलायनाची तयारी सुरू केली होती. परदेशात आधीपासून असलेल्या संपर्कांच्या मदतीने तेथे स्थायिक होण्याचा त्याचा डाव असल्याची माहिती समोर येत आहे. मार्चमध्ये अटक होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार वेगाने केल्यामुळे ‘काळा पैसा पांढरा करण्याचा’ प्रयत्न झाला का, याचीही चौकशी सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button