Letest News
शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा-एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ...
क्राईमशिर्डी

जुगारी पाटणीसह पाच जुगार्‍यांना शिर्डी पोलिसांनी चक्क जंगलातून पकडले -लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा

जुगारी पाटणीसह पाच जुगार्‍यांना पोलिसांची धडक
रांजणगाव देशमुख परिसरातील जंगलात जुगार अड्ड्यावर छापा

sai nirman
जाहिरात

रांजणगाव देशमुख : स्थानिक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत महेंद्र पाटणीसह एकूण पाच जुगार्‍यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

DN SPORTS

kamlakar

पोहेकॉ बी.व्ही. गोराणे आणि पोकॉ तुषार दळवी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. दोन पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी शिर्डी पोलीस स्टेशनहून छापा पथक रवाना केले रांजणगाव देशमुख–तळेगाव दिघे रोडवरील पश्चिम बाजूच्या जंगलात छापा टाकला.

🔸 लिंबाच्या झाडाखाली सुरू होता जुगार

छाप्यात पोलिसांनी खालील पाच इसमांना अंक लिहिताना आणि तिरट जुगार खेळताना/खेळवताना रंगेहात पकडले—

  1. अमोल रामनाथ चव्हाण (31)
  2. इस्माईल गुलाब सय्यद (28)
  3. संजय गोपीनाथ दिघे (55)
  4. महेंद्र सुंदरलाल पाटणी (52)
  5. बाळासाहेब त्र्यंबक गव्हाणे (54)

🔸 जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त

पंचासमक्ष पोलिसांनी केलेल्या झडतीत खालील मुद्देमाल मिळाला—

₹500 — 2 नोटा

₹200 — 1 नोट

₹100 — 2 नोटा

₹50 — 1 नोट

₹20 — 2 नोटा

₹10 — 3 नोटा

निळ्या रंगाचा बॉलपेन

जुगाराचे अंक लिहलेली वही

एकूण रोख रक्कम : ₹1520

सदर सर्व साहित्य पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले.

🔸 जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल

जुगार खेळताना पकडण्यात आलेल्या सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद संगणकीकृत करून तपास सुरू करण्यात आला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button