
शिर्डी नगरपरिषद निवडणूक 2025ची हवा तापायला लागली आहे. या पार्श्वभूमीवर समाजकार्यातून घडलेल्या, जनमानसात साधेपणा, प्रामाणिकपणा आणि समर्पण यासाठी प्रसिद्ध असलेल्या मीराताई यांनी आपल्या मनातील भावना आणि दशकानुदशकांचा समाजकार्याचा प्रवास प्रथमच इतक्या स्पष्टपणे मांडला आहे.
मीराताईंचा आवाज भरून येतो जेव्हा त्या सांगतात—
“माझा लहान भाऊ स्वर्गीय रणजित कारंजे आणि मी लहानपणापासून समाजसेवेत होतो. आजपर्यंत अनेक महिलांचे आणि पुरुषांचे… गल्लीतले असो, कालिका नगरचे असो अथवा शिर्डीतील कुठलेही सामान्य रहिवासी असोत… आम्ही तण, मन आणि धनाने कुठलीही अपेक्षा न ठेवता सर्वांची सेवा केली. माझा भाऊ मला मध्येच सोडून गेला, पण त्याचा सामाजिक कार्याचा वसा मी आजही तितक्याच निष्ठेने चालवत आहे.”
हीच निष्ठा मीराताईंच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख बनली आहे. त्यांचे सामाजिक कार्य हे राजकीय हेतूने नव्हे तर निस्वार्थ भावनेतून उगम पावले आहे. त्या स्वतः सांगतात—
“मला लहानपणापासून समाजकार्याची आवड होती. मी कधीही राजकारण केले नाही. अनेक वेळा कालिका नगरच्या रहिवाशांनी मला सांगितले की मीराताई, तुम्ही निवडणूक लढवा. पण मला कधी रस नव्हता. कारण राजकारणात प्रवेश केला, की समाजकारण मागे पडतं. प्रत्येक पक्षात राजकारणच चालतं.”
🌆 कालिका नगरचे चित्र—पवित्रतेपासून बदनामपर्यंतचा प्रवास
मीराताई ज्या भागात राहतात त्याची कथा सांगताना त्यांच्या शब्दांत वेदना दिसतात.
कालिका मातेमुळे अस्तित्वाला आलेल्या कालिका नगर या भागाने कधीकाळी आध्यात्मिक प्रतिष्ठा मिळवली होती. पण गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली.
“ज्या भागाची ओळख काळिका मातेमुळे पवित्र होती, त्याच भागात अनेक अवैध व्यवसाय सुरू झाले. अनेक गुन्हेगारांनी येथे आसरा घेतला. संपूर्ण शिर्डीत हा भाग बदनाम झाला,” असे मीराताई सांगतात.
परिणामी, या भागातील अनेक कुटुंबांनी
आपले घर सोडले,
दुसरीकडे स्थलांतर केले,
आणि कालिका नगरचे नाव ऐकताच लोकांचे चेहरे उतरू लागले.
ही बदनामी संपवण्यासाठी सामाजिक नेतृत्व हवे होते. पण ते आजपर्यंत मिळाले नव्हते — असे मीराताई स्पष्टपणे सांगतात.
🕯️ बाबूराव पुरोहितांची घोषणा—मीराताईंच्या आयुष्यातील निर्णायक क्षण
शिर्डीतील ज्येष्ठ समाजसेवक, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त प्राधान्य देणारे म्हणून परिचित बाबुरावजी पुरोहित यांनी शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत उतरायचे जाहीर केले तो दिवस मीराताईंच्या जीवनातील खरा वळणबिंदू ठरला.
ते सांगतात—
“ज्या व्यक्तीने कधीही राजकारण केले नाही, तर समाजकारणाला पहिलं स्थान दिलं — त्या बाबूजी पुरोहित यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. प्रभागातील अनेक नागरिकांनी मला सांगितले की मीराताई, तू बाबूजी आणि त्यांच्या सुपुत्र विराट पुरोहित यांच्या पॅनेलमधून लढ.”
हेच ते क्षण जेव्हा मीराताईंनी मनाशी ठरवले —
राजकारण नको, पण समाजकारणासाठी सत्ता हवी.
त्या म्हणतात—
“मला त्यांचे विचार पटले. म्हणून मी बाबूजी पुरोहित यांनी स्थापन केलेल्या स्वाभिमानी शिर्डी आघाडीच्या वतीने, ज्याचे नेतृत्व युवा नेता विराट पुरोहित करीत आहेत, त्या आघाडीच्या वतीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.”
📌 “पॅड नव्हता, सत्ता नव्हती… पण काम मात्र तेव्हाही चालू होतं”
मीराताईंची ही ओळ त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा सार आहे.
“माझ्याकडे कोणताही पॅड नव्हता. मी ना सदस्य, ना पदाधिकारी. तरीही माझे कार्य थांबले नाही. पण प्रभागाचा खरा विकास करण्यासाठी नगर परिषदेत असणे आवश्यक आहे… म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे.”
🌟 आगामी बदलांची घोषणा—शिर्डीसाठी मोठं व्हिजन
त्यांचे व्हिजन स्पष्ट आणि ठाम आहे.
“आम्ही नगरपरिषदेत गेल्यानंतर कालिका नगर नव्हे तर संपूर्ण शिर्डी शहर गुन्हेगारीमुक्त, दहशतमुक्त करू. शिर्डीचा सर्वांगीण विकास करू. महिला, पुरुष आणि येथे येणारे साईभक्त सुरक्षित राहतील याची पूर्ण जबाबदारी घेऊ.”
हे केवळ आश्वासन नाही—तर समाजसेवेतून निर्माण झालेली एक मिशनरी भावना आहे.
🙌 शेवटी मीराताईंचे शिर्डीकरांसाठी भावनिक आवाहन
“आपण गेल्या पन्नास वर्षांपासून राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करणाऱ्या बाबूजी पुरोहित यांच्यावर जसा विश्वास ठेवला, तसाच विश्वास स्वाभिमानी शिर्डी आघाडीवर ठेवावा. आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. हीच माझी नम्र विनंती.”
