संगमनेर शहरातील नाशिक–पुणे हायवेजवळील गणेशनगर परिसरात हाय-प्रोफाइल ड्रग्ज विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल 43 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत फॉर्च्यूनर गाडी (MH 15 FF 9630) मधून ड्रग्जची विक्री करणारा आशिष सुनीलदत्त मेहेरे (वय 28, रा. सातपूर, नाशिक) याला अटक करण्यात आली.
2️⃣ कॉलेज तरुणांमध्ये ड्रग्ज सेवन वाढीची पोलीसांना माहिती; गुप्त सूत्रांद्वारे ऑपरेशन
गेल्या काही महिन्यांत संगमनेर शहरात ड्रग्जची विक्री, हुक्का, मेफेंटरमाइन इंजेक्शन यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या तक्रारी पोलिसांकडे सतत येत होत्या.
कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्जचे सेवन वाढत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ विशेष पथक तयार करून गणेशनगर परिसरात सापळा रचला.
पोलिसांनी पहाटे दबा धरताच संशयित फॉर्च्यूनर गाडी परिसरात दाखल झाली. आरोपी आशिष नेहमीच्या ग्राहकांना शोधत फिरत असताना पथकाने त्याला वेढून पकडले.
3️⃣ अंगझडतीत ड्रग्जची पुडी सापडताच आरोपी पोपटासारखा बोलू लागला; फॉर्च्यूनरमध्ये ड्रग्जचा साठा
आरोपीला पकडून त्याची अंगझडती घेतली असता बंद पाकिटातील ड्रग्जची पुडी सापडली. उग्र वास येताच ती ड्रग्ज असल्याची खात्री पटली.
यानंतर चौकशीत आरोपी पोपटासारखा बोलू लागला आणि गाडीतही ड्रग्ज असल्याचे कबूल केले.
फॉर्च्यूनर गाडीची झडती घेतली असता आणखी ड्रग्जच्या पुड्या मिळाल्या.
एकूण 3 लाख 9 हजारांचा ड्रग्ज, फॉर्च्यूनर गाडी यांसह मिळून 43 लाखांचे रॅकेट उघड झाले.
4️⃣ शहर ड्रग्जचे हब बनतेय? पालकांमध्ये चिंतेचे वातावरण; पोलिसांच्या कारवाईचे कौतुक
संगमनेरमध्ये अलीकडेच तरुणाने कोयत्याने हात वेगळा केलेसारखी घटना, मेफेंटरमाइन इंजेक्शनचा वाढता वापर, गांजा–हुक्का विक्री… या सर्वांमुळे ड्रग्जचे जाळे वाढत असल्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
गेल्या महिन्याभरातील घटनांचा आढावा घेतला असता शहर ड्रग्ज तस्करीचे हब बनत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली.
पोलिसांचे हे ऑपरेशन मात्र नागरिकांमध्ये सुटकेचा श्वास निर्माण करणारे ठरले.
या दमदार कारवाईत P.S.I. श्रीकांत सावंत, संतोष पगारे, अनिल कडलग, राहुल सारबंदे, दत्तात्रय मेंगाळ, बापु हांडे, विजय खुळे, राम मुकरे, सुरेश मोरे, अजित कुरहे, रोहिडास बांडे, विशाल कापगर, आत्माराम पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.