
प्रभाग क्रमांक ५ मध्ये राजकीय तापमान अचानक वाढलं आहे. समाजसेवक घनश्याम प्रेम सोनजी सोनजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच संपूर्ण प्रभागात खळबळ उडाली आहे. सामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कार्यकर्ता आता रिंगणात उतरल्यामुळे विरोधकांच्या गोटात चांगलीच घालमेल दिसू लागली आहे.
सामाजिक कार्यात सिद्ध केलेलं नेतृत्व
एवढ्या वर्षांत कोणाच्याही घरचं सुखदुःख असो—घनश्याम प्रेम सोनजी सर्वात आधी पोहोचलेला चेहरा. समाजासाठी झटणं, प्रत्येक समस्येत मार्ग काढणं आणि स्वतः लोकांमध्ये मिसळून काम करणं ही त्यांची ओळख.
लॉकडाऊनमध्ये स्वतःची कठीण परिस्थिती असूनही मदतीचा हात
महामारीच्या काळात अनेकजण घरातून बाहेर पडण्यास घाबरत होते, तेव्हा सोनजींनी स्वतःच्या मर्यादित परिस्थितीतही कालिकनगरातील शेकडो कुटुंबांना किराणा किट वाटून मदत केली.
जेव्हा परिस्थिती वाईट होती, तेव्हा मदतीला धावून जाणारा नेता खराच!
२४ तास उपलब्ध – कोणतीही वेळ, कोणतीही अडचण
समस्यांना उद्या नको—आत्ता उपाय हवा, हे सोनजींचं तत्त्व.
म्हणूनच प्रभागातील जनता त्यांना एकाच शब्दात ओळखते — “२४ तास उपलब्ध होणारा सामाजिक कार्यकर्ता.”
प्रेमळ स्वभाव, पण प्रश्नांवर कडक भूमिका
प्रेमळ स्वभाव, सुसंवाद आणि लोकांशी रक्ताचं नातं जपणारा हा नेता जेव्हा समाजाच्या प्रश्नांवर बोलतो तेव्हा मात्र तडाखेबाजपणे भूमिका मांडतो. म्हणूनच कालिकनगरकरांची हाक उठली — “आता नाही तर कधीच नाही!”
प्रभाग ५ मध्ये बदलाची लाट
लहानपणापासून समाजसेवेची आवड, सर्वांमध्ये मिसळून राहणारा स्वभाव, आणि प्रश्न सोडवण्याची शैली – या सर्वामुळे आज प्रभाग ५ मध्ये बदलाची लाट सुरू झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.
सोनजी उमेदवारी अर्ज दाखल करताच रस्त्यापासून चहाच्या दुकापर्यंत एकच चर्चा —
“यंदा प्रभाग ५ मध्ये समीकरणं बदलणार!”
