कर्जत | प्रतिनिधी
खांडवी (ता. कर्जत) परिसराला हादरवून सोडणाऱ्या प्रल्हाद साळवे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार अवघ्या 24 तासांत जेरबंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या चपळ आणि नेमक्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
🔍 प्रल्हाद साळवे कुठे गायब झाले?
12 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात कामानिमित्त गेलेले प्रल्हाद सोनाजी साळवे दोन दिवस घरी परतले नाहीत.
14 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह खांडवी शिवारातील इरिगेशनच्या पत्र्याच्या खोलीत आढळताच परिसरात खळबळ उडाली.
🔴 आरोपी कोण?
पोलीसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला—
गु.र.नं. 246/2025, कलम 103(1), 3(5) – खून
दोन संशयितांचे नावे —
जमली उर्फ संध्या गोरख भोसले
धन्या उर्फ धनंजय राजेकर काळे (वय 19), रा. चिंचोली रमजान
जमलीला आधीच अटक झाली होती. मात्र मुख्य आरोपी धनंजय काळे फरार होता.
⚡ धडाकेबाज तपास – पथक तयार
स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्वतः खांडवीत उपस्थित राहून घटनास्थळाची पाहणी केली आणि
पोउपनि समीर अभंग यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले.
पथकातील अधिकारी व अंमलदार —
रमेश गांगर्डे, गणेश लबडे, हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, भिमराज खर्से, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, मनोज साखरे, प्रशांत राठोड, महादेव भांड
— यांनी रात्रंदिवस शोधमोहीम राबवली.
🎯 सापळा रचला आणि… 24 तासांत ‘गेम ओव्हर’
गोपनीय बातमीदारांची माहिती, तांत्रिक तपास आणि सततच्या पाठपुराव्यामुळे आरोपी श्रीगोंदा परिसरात लपल्याचे पथकाला समजले.
15 नोव्हेंबर रोजी पथकाने अचूक सापळा रचून धनंजय काळे याला ताब्यात घेतले.
💥 चौकशीतील धक्कादायक उघड
चौकशीत आरोपीने दिलेली कबुली —
मयत प्रल्हाद साळवे आणि आरोपी जमली उर्फ संध्या भोसले यांच्यात विवाहबाह्य संबंध होते.
पैशाच्या मागणीवरून मोठा वाद वाढला.
रागाच्या भरात दोघांनी मिळून खून केला.
⛓️ आरोपी पोलीसांच्या ताब्यात – पुढील तपास सुरू
मुख्य आरोपी धनंजय काळे याला मिरजगांव पोलीस ठाण्यात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.
👮 वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही शिताफीची कारवाई
मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली आहे.