शिर्डी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांनी आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 पासून आपल्या न्यायहक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (MADC) दिलेल्या आश्वासनांनंतरही प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीतून डावलण्यात आल्याने शेतकऱ्यांत प्रचंड संताप आहे.

🔥 प्रशिक्षण पूर्ण, पण नोकरी नाही — प्रशासनाचा विश्वासघात!
शिर्डी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दिल्ली व कोलकाता येथे Aviation Fire Fighting Trainin
g देण्यात आली होती. प्रशिक्षणानंतर नोकरी देण्याचे लेखी आश्वासन विमानतळ प्रशासनाने दिले होते. मात्र प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करूनही त्या तरुणांना नोकरी न देता थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आले, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.
✊ “न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच!” — प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
या विश्वासघात आणि अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी व प्रशिक्षणार्थींनी आजपासून शिर्डी विमानतळ मुख्य प्रवेशद्वाराजवळ बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांचा ठाम निर्धार आहे की मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही.
📢 शेतकऱ्यांची मागणी — थेट MADC च्या करारावर नोकरी द्यावी
शिर्डी विमानतळ प्रकल्पग्रस्तांची स्पष्ट मागणी आहे की,
“महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या शिफारशीने एविएशन अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना कोणत्याही ठेकेदारामार्फत नव्हे, तर थेट MADC च्या कॉन्ट्रॅक्टवर नोकरीत घेण्यात यावे.”
ग्रामस्थ आणि नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की शिर्डी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील या उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी साथ द्यावी.
