
शिर्डी, जि. अहिल्यानगर (दि. १७ ऑक्टोबर) —
श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विद्युत विभागात तब्बल ₹७७,१३,९२३ रुपयांचा विज साहित्य अपहार झाल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात एकूण ४७ कर्मचारी आणि अधिकारी यांच्याविरोधात शिर्डी पोलिसांनी गुन्हा क्रमांक ९३६/२०२५ भा.दं.वि. कलम ३७९, ३८१, ४०८, ४०९, ४६५, ४६७, ४७१, १२०(ब) अन्वये नोंदवला आहे.
या प्रकरणाची फिर्याद संजय बबुताई काळे (वय ६३, स्वामी विवेकानंदनगर, कोपरगाव) यांनी दाखल केली असून, त्यांनी पूर्वी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या क्रिमिनल रिट पेटिशन क्र. ७९१/२०२३ प्रकरणात न्यायालयाने १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिसांना तक्रार नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
🧾 घोटाळ्याची पार्श्वभूमी:
विद्युत विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विज साहित्याची डेड स्टॉक रजिस्टरमध्ये योग्य नोंद न ठेवता, त्यात बनावट नोंदी करून साहित्याचा अपहार केला.
लेखापरीक्षणानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि एकूण ₹७७ लाख १३ हजार ९२३ रुपयांचा विज साहित्य तुटवडा असल्याचे निदर्शनास आले.
तपासादरम्यान ३९ आरोपींनी आपापली जबाबदारीची रक्कम परतफेड केली असून, उर्वरित ८ आरोपींनी अजूनही परतफेड केलेली नाही. सर्व आरोपींनी मिळून कट रचून संस्थेचा आर्थिक अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
👮♂️ गुन्ह्याचा तपास सुरू — पोनि रणजित गलांडे यांच्या देखरेखीखाली चौकशी:
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे (मो. ९७३०२७१५६०), शिर्डी पोलीस स्टेशन यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
पोलिसांनी संस्थेच्या संबंधित नोंदी, लेखापरीक्षण अहवाल आणि जबाबदाऱ्या तपासण्यासाठी स्वतंत्र चौकशी पथक तयार केले असून, आरोपींची जबाबदारी ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
⚖️ साई संस्थान हादरलं — आर्थिक गुन्हा शाखेची चौकशी शक्य:
श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री साई संस्थानात झालेल्या या घोटाळ्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास पुढे आर्थिक गुन्हा शाखेकडे (EOW) सोपविण्याची शक्यता आहे. संस्थान प्रशासनानेही अंतर्गत तपास सुरू केला आहे.
📋 आरोपींची संपूर्ण यादी (क्रमांकानुसार):
क्र. आरोपीचे नाव पद / विभाग
1 कै. खाडगीर बी.डी. विद्युत पर्यवेक्षक
2 नामेदेव रामचंद्र जाधव विद्युत पर्यवेक्षक
3 बाळासाहेब केशव सावंत विद्युत पर्यवेक्षक
4 वसंत दामोधर गाडेकर विद्युत पर्यवेक्षक
5 साहेबराव पांडुरंग लंके प्र. लेखाधिकारी (अल्प विभाग)
6 अशोक रंभाजी औटी प्रशासकीय अधिकारी
7 रवि सतिष घुले कार्यकारी अभियंता
8 रघुनाथ भागाजी आहेर प्र. कार्यकारी अभियंता
9 संजय मधुकर जोरी कार्यकारी अभियंता
10 विजय गणपतराव रोहमारे उप कार्यकारी अभियंता
11 राजेंद्र सोपान जगताप प्र अभियंता
12 प्रकाश नाना अभंग प्र अभियंता
13 राहूल मदन इंगवले मदतनिस, विद्युत विभाग
14 सुनिल काशीनाथ धरम मदतनिस, विद्युत विभाग
15 एन. आर. शेख तारतंत्री, विद्युत विभाग
16 दिपक शिवाजी तुरकणे कुशल कंत्राटी कर्मचारी, विद्युत विभाग
17 राजेंद्र मोहनराव बोठे तारतंत्री, विद्युत विभाग
18 साईनाथ ईनामके आऊटसोर्स कर्मचारी, साई धर्मशाळा
19 महेश मुंढरे आऊटसोर्स कर्मचारी, साई धर्मशाळा
20 स्वप्निल जोंधळे आऊटसोर्स कर्मचारी, साई धर्मशाळा
21 प्रमोद शंकरराव चिने तारतंत्री, विद्युत विभाग
22 किशोर एकनाथ महाले तारतंत्री, विद्युत विभाग
23 उमाकांत तुपे तारतंत्री, विद्युत विभाग
24 बाळू कृष्णाराव कुलकर्णी मदतनिस (सेवानिवृत्त), विद्युत विभाग
25 अरुण गणपत जाधव तारतंत्री, पाणीपुरवठा विभाग
26 संजय बाळासाहेब बनसोडे मदतनिस, विद्युत विभाग
27 सागर रमेश जगताप कुशल कंत्राटी कर्मचारी, विद्युत विभाग
28 संजयकुमार एकनाथ हारणे मदतनिस, विद्युत विभाग
29 शरद बाबासाहेब मते कुशल कंत्राटी कर्मचारी, विद्युत विभाग
30 महेश मोढे अकुशल कंत्राटी कर्मचारी, ध्वनीक्षेपण व टेलिफोन विभाग
31 सागर खामकर तारतंत्री, पाणीपुरवठा विभाग
32 रामनाथ लक्ष्मण वाकचौरे तारतंत्री, विद्युत विभाग
33 सोमनाथ साहेबराव पाचेरे तारतंत्री, विद्युत विभाग
34 विक्रम सुरेश देवकर कुशल कंत्राटी कर्मचारी, विद्युत विभाग
35 सुभाष नामदेव लांडगे तारतंत्री, विद्युत विभाग
36 महेश विठ्ठल गोंदकर तारतंत्री, विद्युत विभाग
37 भानुदास दादा बायके तारतंत्री (सेवानिवृत्त)
38 विलास भागूनाथ जेजूरकर तारतंत्री, विद्युत विभाग
39 सागर ठोंबरे आऊटसोर्स कर्मचारी, साई धर्मशाळा
40 गोरक्षनाथ आप्पा काळे तारतंत्री, विद्युत विभाग
41 सुनिल पुंडलीक वाघ तारतंत्री, विद्युत विभाग
42 विलास रघुनाथ भावसार तारतंत्री, विद्युत विभाग
43 अनिल नामदेव वाणी तारतंत्री, विद्युत विभाग
44 सर्जेराव मच्छिंद्र गोरे कुशल कंत्राटी कर्मचारी, विद्युत विभाग
45 पाराजी चांगदेव वाणी मदतनिस, विद्युत विभाग
46 साईनाथ परसराम आव्हाळे तारतंत्री, विद्युत विभाग
47 योगेश रामचंद्र रोहम अकुशल कंत्राटी कर्मचारी, विद्युत विभाग
🔍 पुढील तपासाची दिशा:
या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू असून, आरोपींना समन्स पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे. साई संस्थानसारख्या धार्मिक व आर्थिकदृष्ट्या संपन्न संस्थेच्या पवित्र प्रतिमेला या घोटाळ्यामुळे गंभीर धक्का बसला आहे.फिर्यादी संजय बबुताई काळे यांनी या घोटाळ्याशी संबंधित सर्व माहिती माहिती अधिकारातून (RTI) प्राप्त केली होती.
सदर माहितीच्या आधारे त्यांनी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विद्युत विभागातील अनियमितता, विज साहित्याच्या गैरनोंदी आणि अपहार याबाबत शिर्डी पोलिसांकडे तक्रार दिली होती.
मात्र, त्या तक्रारीवर तात्काळ कारवाई न झाल्याने, संजय काळे यांनी शेवटी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद यांच्याकडे दाद मागितली.
न्यायालयाने १५ ऑक्टोबर २०२५ रोजी शिर्डी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरच सदर गुन्हा नोंदवण्यात आला.
स्थानिक पातळीवर संबंधित विभागात लेखापरीक्षणादरम्यान झालेल्या अनियमितता प्रशासनाच्या नजरेत असतानाही योग्य पातळीवर तातडीची कारवाई न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

