शिर्डी – शिर्डीतील सन्मित्र युवक मंडळ गेली अनेक वर्षे धार्मिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असून, या मंडळाचा ६१ वा नवचंडिका याग मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लक्ष्मी माता मंदिर, लक्ष्मी नगर येथे संपन्न होणार आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी मंडळाच्या वतीने हा धार्मिक विधी भक्तीभावाने पार पडणार असून, स्थानिक नागरिक, भक्तगण आणि सर्व मंडळ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धार्मिक विधी व महाप्रसाद
यागाच्या कार्यक्रमात देवीची विशेष पूजा, मंत्रोच्चार, आरती आणि धार्मिक विधी संपन्न होतील. त्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धाळूंनी वेळेवर उपस्थित राहून धार्मिक उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मंडळाची सामाजिक परंपरा
सन्मित्र युवक मंडळाने गेल्या सहा दशकांहून अधिक काळ शिर्डीत विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. या उपक्रमातून श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक बांधिलकी यांना बळ मिळते. नवचंडिका याग हा मंडळाचा प्रमुख व पारंपरिक उपक्रम असून, यामध्ये वर्षानुवर्षे शेकडो भक्त सहभागी होत असतात.
स्थानिक नागरिकांमध्ये या धार्मिक कार्यक्रमाबाबत उत्सुकता असून, लक्ष्मी नगर परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघणार आहे. आपन सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सन्मित्र मंडळाचे संस्थापक तसेच माजी नगरसेवक गजू अण्णा शेर्वेकर यांनी केले आहे
