
शिर्डी प्रतिनिधी समजसेवक गणेश अनिलराव गोंदकर पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त साई सेवा फाऊंडेशन, शिर्डी व मोनाली फॅशन डिझायनिंग, कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळाचे उदघाटन श्रीमती. पद्मावती अनिलराव गोंदकर पा. यांच्या हस्ते करण्यात आले

आज रविवार दि.१४/०९/२०२५ रोजी दु. १२.०० ते ०३.०० वाजेपर्यंत शेकडो महिलांच्या उपस्तिथीत हॉटेल मृणालिनी, (जुने निम पॅलेस हॉटेल) बाजारतळ रोड, कालिकानगर, शिर्डी. ह्याठिकाणी संपन्न झाले
ह्या कार्यशाळेत यापुर्वी टेलरींग कोर्स केला पण परफेक्ट मास्टर कटींग येत नाही
गरजवंत टेलरींग महिलांनी आपल्या गावात टेलरींग महीला बचतगट स्थापन करुन सुरु केला तर त्याचे फायदे पुढीलप्रमाणे त्या गटाला फॅशन डिझायनींग सर्टीफिकेट कोर्स कटींगचे प्रशिक्षण तुमच्या गावात दिले जाईल. १२ ही महिने सतत (रोजगार) काम मिळेल असे ट्रेनिंग देण्यात येईल.
घरगुती व्यवसाय कसा वाढवायचा शासकीय लाभदायक योजना मार्गदर्शन अनुभवी तज्ञ प्रशिक्षक यापुर्वी अनेकांनी अनुभवलेला ट्रेनींग प्रोग्राम ह्याबाबत माहिती देण्यात आले याचे गरजू मुलींनी व गरजु महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला ह्यावेळी ३५ वर्ष अनुभव असलेले तज्ञ प्रशिक्षक श्री. शंकर बोरनारे M.F.D. चॅनल संस्थापक सौ. सोनाली शरद आगलावे फॅशन डिझायनर सौ. मोनाली महाले (नाशिक फॅशन डिझायनर) सहभागी होत
ज्या महिलांना टेलरींग कोर्स केला शिवणकाम येते, पण परफेक्ट (मास्टर) कटींग येत नाही टेलरींग क्षेत्रात बिनचुक कटींग बाबतचे प्रश्न अनेक टेलरिंग विषयावर M.F.D. मॅझिक स्केल द्वारे मार्गदर्शन करण्यात आले ह्यावेळी समजसेवक गणेश गोंदकर पाटील यांना वाढदिवसा निमित्त त्यांचे सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या
