काल दिन के 12/09/2025 रोजी रात्री 10/00 वा. चे सुमारास मी व माझी सासु माझ्या दोन मुली असे आम्ही आमचे राहते घरासमोर बसलेलो असतांना, आमचा पाहुना नामे नितीन भाऊसाहेब शहाणे हा आमचे घरासमोर आला व मला म्हणाला की, तुझा नवरा कुठे आहे असे मला म्हणाल्यानंतर मी त्यांना म्हणाले की,
ते सध्या घरी नाहीत, असे म्हणाल्यानंतर त्याने माझा बळजबरीने हात धरला व मला लज्जा उत्पन्न होईल असे बर्तन केले. तसेच मला म्हणाला की, मी तुझ्या नवऱ्यावर जसे गुन्हे दाखल केले तसे तुमच्यावर देखिल दाखल करील. तुमचे पैसे देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या,
असे म्हणाल्यानंतर माझी सासू तेथे आली तेव्हा त्याने त्यांना देखिल धक्का दिला माझा गाऊन पकडला. त्यावेळी मी त्याचा हात अटकला असता त्याने माझा डावा हात परत पिळला गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली व तो तेथून निघुन गेला म्हणून माझी नितीन भाऊसाहेब शहाणे निमगाव याच्या विरोधात फिर्याद आहे पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनं करीत आहे

