
शिर्डी प्रतिनिधी

शहराचे विद्रुपीकरण होऊ नये जाती तणाव होऊ नये दंगली घडू नये म्हणून देशातील सर्वोच्च न्यायालयाने फ्लेक्स बोर्डावर बंदी घातलेली आहे परंतु ह्या आदेशाला नागरिकांकडून तीदांजली देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे रस्त्यालगत फ्लेक्स लावल्याने लक्ष विचलित होऊन अनेक अपघात झालेले आहेत अनेक लोकांना जीवे गमवावी लागली आहेत
अनेक फ्लेक्सवर जातीय तणाव निर्माण झालेले आहेत त्यातून अनेक ठिकाणी दंगली घडल्या आहेत काही दिवसापूर्वी गणेश उत्सवा निमित्त शिर्डी शहरात गणेश मंडळांनी अनेक फ्लेक्स लावलेले होते एका मंडळाच्या फ्लेक्सवर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच माजी खासदार सुजय विखे यांचे फोटो होते त्याच मंडळातील कार्यकर्त्यांनी फ्लेक्स फाडले होते त्यावरून शिर्डीसह जिल्ह्यात वातावरण गरम झाले होते
पोलिसांनी याची गंभीरता बघत तात्काळ यंत्रणा कामाला लावली आणि फ्लेक्स फाडणारे चौघांना ताब्यात घेतल्याने वातावरण शांत झाले त्यानंतर नगर परिषदेने शिर्डी शहरातील अनेक फ्लेक्स काढलेत अजूनही शहरात फ्लेक्स काढण्याचे काम सुरूच आहे याचे स्वागत करीत सामाजिक कार्यकर्ते गणेश अनिलराव गोंदकर पाटील यांनी शिर्डी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले त्यात म्हटले आहे कि
नामदार व माजी खासदार विखे कुटुंबीय यांनी जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने इतिहासात पहिल्यांदा प्रदीप मिश्रा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शिवमहापुराणाचे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्याचे फ्लेक्स शिर्डी शहरात लावलेले होते ते नगर परिषदेने काढले आहेत त्यावर गोंदकर यांनी ते तशेच राहू द्यावे कारण कि ते फ्लेक्स काही राजकीय कार्यक्रमचे नाहीत शिवपुराणाचा जास्तीत जास्ती भाविकांनी लाभ व्हावा ह्या हेतूने लावण्यात आलेले आहेत
ते नगर परिषदेने काढू नये अशी मागणी करण्यात आलेली आहे ह्यावेळी .गणेश अनिलराव गोंदकर धीरज पठाडे राणीताई साईनाथ भोपळे सुरेखा दिनेश गायकवाड वर्षाताई गणेश डोईफोडे मंगलताई अन्नासाहेब वाघचौरे, साईनाथ भोपळे लक्ष्मीबाई बाबासाहेब डोईफोडे. गणेश डोईफोडे, नवाब पठाण,
दिनेश गायकवाड. पोपटराव कोळगे युसुफ सय्यद शंकर सोनवणे वाजिद सय्यद योगेश म्हसे हे उपस्तिथ होते अर्ज स्वीकारल्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश गोंदकर यांना आश्वासित केले कि आपल्या मागणीचा विचार करण्यात येईल
