
थायलंड येथे झालेल्या बॉडी बिल्डींग स्पर्धेत शिर्डीच्या निलेश मंगेश वाडेकर यांना थायलंड ( बँकॉका ) येथे झालेल्या 57 व्या एशियन बॉडीबिल्डींग अॅन्ड् फिजीकस् स्पोर्ट्स चॅम्पियनशीप 2025 यामधील MEN’S FITNESS PHYSICQUE UP TO 170CM या गटामध्ये कास्य 🥉 पदक ( BRONZE MEDAL ) मिळाल्याने सर्वत्र शिर्डीमध्ये व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे . आहिल्यानगर मधून या एशियन सामन्यासाठी एकमेव स्पर्धक म्हणून निलेश मंगेश वाडेकर यांचे सिलेकशन होऊन त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले .
IBBF ( INDIAN BODY BUILDERS FEDERATION ) या संघटने मार्फत त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या MEN’S FITNESS PHYSIQUE UP TO 170 CM या गटामध्ये BRONZE🥉MEDAL हे पारितोषिक कमावले आणि संपूर्ण भारतात , महाराष्ट्राचे आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्याचे आणि संपूर्ण शिर्डी शहराचे नाव सर्वत्र देशभरात झळकावले आणि या पुढेही त्या स्पर्धेसाठी पुढील वेळेस GOLD 🥇 MEDAL घेण्याचे आपले मानस आहे असे सांगितले .
श्री निलेश मंगेश वाडेकर शिर्डीतील डॉ. हेडगेवार नगरमध्ये राहात आहे. पुणे येथील इंडियन बाँडी बिल्डर फेडरेशन या संस्थेमार्फत या स्पर्धेत निवड होऊन ५७ व्या एशियन बाँडी बिल्डिंग ऑन्ड फिजिकस् स्पोर्ट्स चॅम्पियनशीप 2025 मेन्स फिटनेस फिजीसिओ अप टू 170 सी एम मध्ये कांस्य पदक मिळवले त्याबददल संपुर्ण शिर्डी करांनकडून त्याचे हार्दीक हार्दीक अभिनंदन 🎉🎉 .
सुरेश मुळे, शिर्डी, दैनिक साई दर्शन न्युज
