
मातुलठाण, ता. श्रीरामपूर येथुन शेतकरी शिवाजी बलभिम लहारे, रा. मातुलठाण, ता. श्रीरामपूर यांचे घरासमोर त्यांचे नातेवाईक जिवन किसन कुटे, रा. जुन्नर यांचे मालकीचा पिवळया रंगाचा जेसीबी क्र MH 14 KW 3874 हा अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला होता. सदर बाबत श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गु.र. नंबर 404/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
जाहिरात

मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी यांचे साधानाचे चोरी उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/ विजय पवार, पोकॉ/ किशोर आबासाहेब शिरसाठ, पोकॉ/ रमिजराजा रफिक आतार व पोकॉ/ अमृत शिवाजी आढाव आणि पोहेकॉ/ फुरकान शेख यांचे पथक तयार करुन सदर पथकास चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
सदर पथक गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करत असतांना, गुप्त वातमीदाराकडुन माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नामे अशोक हरिभाऊ राशिनकर, रा. नायगांव, ता. श्रीरामपूर याने केला आहे. त्यावरुन पथकाने व्यवसायिक कौशल्य आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर इसमाचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यांचे पुर्ण नांव अशोक हरिभाऊ राशिनकर, वय 28 वर्षे, रा. नायगांव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर असे सांगितले. त्यांस गुन्हयातील चोरीस गेलेला जेसीबीबाबत विचारपूस केली असता, त्यांने गुन्हा केल्याची कबुली देवून, सदरचा जेसीबी हा त्यांचे ओळखीचे कैलास सावित्रा रोडे, रा. येठेवाडी, ता. संगमनेर येथे वस्तीवर लावलेला असल्याबाबत सांगितले. त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी जावुन सदर गुन्हयातील चोरीस गेलाला जेसीबी पंचनामा करुन, गुन्हयाचे तपास कामी जप्त केला आहे.
वरील प्रमाणे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गु.र. नंबर 404/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपीस आणि चोरीस गेलेला जेसीबी तपासकामी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन, पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
DN SPORTS