
शिर्डी प्रतिनिधी / गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शिर्डी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. अनैतिक मानवी
व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत (पिटा) शहरातील चार हॉटेल्सना सील ठोकण्यात आल्या मुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे
सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे
यांच्या आदेशाने व नुकताच पदभार घेतलेले पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत २६ ऑगस्ट रोजी रात्री ‘कोंबिंग मोहीम राबवण्यात आले.
पिटा कायद्यान्वये कारवाई झालेल्या हॉटेल्सवर सील करण्यासाठी प्रांताधिकारीमाणिक आहेर यांच्याकडे प्रस्ताव शिर्डी पोलिसांनी सादर केला होता.प्रस्ताव मंजूर होताच शिर्डी पोलिसांनी साई वसंत विहार लॉज (सोनार गल्ली), हॉटेल साई, साई वीरभद्र (सुतार गल्ली), आणि हॉटेल शीतल (निमगाव) या ४ हॉटेल्स सील केले.
या प्रसंगी इतरही कारवाया करण्यात आल्या. पोलिसांनी १८अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करत ८ पुरुष अमित विजय कुऱ्हाडे, रोहित उर्फ गुड्ड्या आव्हाड, अक्षय बबन गव्हाणे , सिद्धार्थ बाळू पवार, गोविंद एकनाथ गुडे सचिन राजू वर्मा, गौतम प्रल्हाद खंडीझोड, यांच्यासह ६ महिलांना अटक करून न्यायालयात हजर केले.
दारूबंदी कायद्यान्वये चार गुन्हे दाखल करून बारा हजार ४०
रुपयांचा मुद्देमाल, तर जुगार कायद्यान्वये एका प्रकरणात ६५, दोनशे रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला. बारा वर्षापूर्वी पासून फरार असलेला निमगाव कोराळे. येथील आरोपी शंकर-वेरणस्वामी याला देखील ताब्यात घेण्यात आली त्याबरोबरच आरोपी दिनेश मोकळ यांस अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे. यांच्या सह सपोनि गणेश धुमाळ,पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, सहाय्यक फौजदार विजय गोलवड, यांनी सहभाग घेतला कारवाई प्रसंगी मोठा पोलीस फौजफाटा या कारवाईत सहभागी झाला होता
शिर्डी शहरात पोलीसानी देह व्यापार व अनैतिक कामासाठी हॉटेल उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेलवर थेट सील करण्याची कारवाई केल्यामुळे शिर्डी शहरात असलेल्या हॉटेल चालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली आहे या पुढील काळात देखील अशाच प्रकारे अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या विरोधात पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी या धाडसी कारवाईच्या माध्यमातून दिल्यामुळे अनेकांनी ह्या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे
देह व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी केले चार हॉटेल सील
हॉटेल्स झाल्यामुळे सीडी परिसरात मोठी खळबळ
हॉटेल चालवण्यास घेणाऱ्या परराज्यातील चालकांमध्ये घबराट
हॉटेल सील झाल्यामुळे अनामत दिलेल्या हॉटेल मालकांकडे लाखो रुपये अडकून पडणार
शिर्डी सह पंचक्रोशीत फक्त हॉटेल सील केल्याची मोठी चर्चा *
हॉटेल सिल होण्यापेक्षा प्रामाणिकपणे केलेल्या व्यवसाय बरा काही हॉटेल चालकांची मानसिकता
रात्रीच्या वेळी ठराविक परिसरात फिरणाऱ्या देह व्यापार करणाऱ्या महिला पोलिसांच्या रडावर
आंबट शौकीन मंडळींनी घेतला शिडी पोलिसांच्या कारवाईचा धसका
मध्यरात्रीच्या वेळी मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर देखील कारवाईची गरज
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची धडक कारवाईला सुरुवात
पोलिसांच्या कारवाईची भनक लागताच शिर्डीतून अनेक जण परागंदा
शिर्डीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सामसूम
अवैध गुन्हेगारी रोखण्यासाठी दैनिक साई दर्शनचा मोठा पाठपुरावा पोलिसांच्या कारवाईमुळे शिर्डी ग्रामस्थात समाधानाचे वातावरण