
शिर्डी प्रतिनिधी
महाराष्ट्रातील तीर्थस्थानापैकी सर्वात गर्दीचं ठिकाण म्हणून शिर्डी शहराची एक नवी ओळख आहे, याठिकाणी अनेक राज्यातून भाविक आपल्या वाहनातून साई दर्शनासाठी येत असतात त्यामुळे या वाहनांची संख्या पाहता रस्त्यावर अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते तर यावर कंट्रोल करण्यासाठी शिर्डी वाहतूक शाखेच पोलीस कार्यालय असून याठिकाणी पोलीस निरीक्षक व अन्य अधिकारी व कर्मचारी ही जबाबदारी पार पडतात.
लागोपाठ सुट्ट्या, साईबाबांचे उत्सव यावेळी मात्र वाहतूक कोंडी तर होतेच परंतु स्थानिक शनी शिंगणापूर, नगरसूल, मनमाड, संभाजीनगर, पुणे, नाशिक मुंबई याठिकाणी खासगी प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने आहेत मात्र त्यात भर पडली आहे स्थानिक ट्रॅव्हल्स व्यवसाय करणारे टेम्पो ट्रॅव्हल्स, मॅक्स, बोलेरो,टाटा म्यॅझिक, अँपे रिक्षा, खासगी बस व इतर वाहने यांची संख्या पाच हजाराहून जास्त आहे. त्यात वाळूचे डंपर, ट्रॅक्टर याचाही समावेश आहे.
ही सर्वं वाहने रात्रंदिवस प्रवासी वाहतूक करतात मात्र त्यांच्या चालक मालकांना कोणताही धाक, भीती नां पोलिसांची आहे ना आरटीओची कारण या दोनही संस्थेने कारवाई केली तर शिर्डी शहरात भाविकांना, विदयार्थ्यांना तसेच स्थानिक रहिवासीयांना होणाऱ्या रोजज्या त्रासातून मुक्ती मिळेल. पण स्थानिक वाहतूक शाखेचे पोलीस दररोज अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करतात
मात्र आरटीओची कारवाई फारच कमी प्रमाणात आहे तर ठराविक तारखेलाच हे अधिकारी कर्मचारी ठराविक हॉटेलवर येतात तर त्यांना भेटायला अनेक ट्रॅव्हल्स चे चालक मालक नेमकी कशासाठी भेटायला येतात हे मात्र कोडंच आहे. तर शिर्डीत झालेल्या ग्रामसभेत कोणत्या वाहनांचा किती हफ्ता आहे
आणि वाहनांची हजारोच्या संखेची बेरीज केली तर हा हफ्ता पन्नास लाखाहून जास्त असल्याचा आरोप प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी जाहीर सभेत केला होता. सध्या रस्त्यावर, मंदिराच्या दर्शन रांगेसमोर, पिंपळवाडी रोडवर, कानिफनाथ चौकात बेकायदेशीर पार्किंगचा आणि रोजच होणारा त्रास यावर ठोस कारवाई होत नसल्याने संशयाला वाव आहे
तर भाविक आणि शिर्डीतील स्थानिक रहिवाशी यांना एकच प्रश्न सतावत आहे तो म्हणजेच याला सर्वस्वी जबाबदार असणारे आरटीओ नेमकी गप्प का ?