
शिर्डी प्रतिनिधी अवध्या काही दिवसामध्ये गणेशोत्सव येत आहे यंदाचा गणेशोत्सव व ईट ए-मिलाद आनंदात साजरा करा तसेच सोशल मीडियावर सायवर क्राईमच्या माध्यमातून करडी नजर पोलिसांची असणार आहे, डीजेवर गाणे वाजविल्यास कडक कारवाई करण्यात येईल ही कारवाई टाळण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करा असे आवाहन श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले
यावेळी गणेश मंडळ व शांतता कमिटी सदस्य कार्यकत्यांनी मिरवणूक मार्गावर येणारे अडथळे, मोकाट जनावरांचा होणारा प्रास तसेच विद्युत पुरवठा खंडीत होणे, तसेच चौकाचौकात पोलीस बंदोबस्त बाबत मागण्या मांडल्या. उपस्थित संबधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत लगेच तत्परता दाखविण्यासाठी योग्य नियोजन करा अशा सूचना अप्पर पोलीस अधीक्षकांनी यावेळी बोलतांना दिल्या.
यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौर महणाले की यंदा देखील शांतपणे गणेश उत्सव व ईद ए मिलाद साजरी होईल, लोकमान्य टिळक यांनी मध्ये १३२ वर्षा पासून महाराष्ट्रभर गणेश उत्सवाची सुरवात केली हा उत्सवा आता देशातील विविध राज्यात व इतर देशात ही पोहचला आहे
याच उत्सवाच्या माध्यमातून आता सामजिक उपक्रम हाती घ्यावे जेणेकरुन लोकमान्य टिळक यांचा उद्देश साध्य होईल व येणाऱ्या युवा पिढीला च चांगले संस्कार मिळेल असा संदेश दिला. गणेश उत्सव काळात आपल्या परिसरातील शालेय विद्यार्थी यांना इतरत्र होणाऱ्या खर्चाला फाटा देत मंडळाच्या वतीने सायकल, गणवेश, दप्तर, वह्या पुस्तके, वाटप करावी
जेणेकरून एक सामजिक संदेश जाईल. डीजे वर गाणे वाजवल्यास कारवाई करण्यात येईल गणेशोत्सव मंडळाने रितसर परवानगी घ्यावी रात्री अपरात्री सर्वानी काळजी घ्यावी व जेणेकरून गणेशउत्सव शांततेच्या मार्गाने साजरा होईल असे आवाहन केले,