

सावळविहीर बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे सहकारी साखर कारखानदारीचे जनक कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शेतकरी दिन या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल मध्ये साजरा करण्यात आला आहे यावेळेस शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक सल्लागार समितीचे वतीने बिस्कीटचे वाटप करण्यात आलेले असून
गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप शाळेचे माजी विद्यार्थी किरण राजेंद्र आगलावे पाटील यांनी केले आहे याप्रसंगी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवन कार्याचा गौरव स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जपे पाटील यांनी करून शेतकरी दिनाचे ही महत्त्व विशद केले आहे
याप्रसंगी उपसरपंच श्री विकास जपे पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय जपे पाटील माजी उपसरपंच श्री गणेश कापसे पाटील सागर आरणे श्री किरण आगलावे पाटील पत्रकार राजेंद्र दुनबळे मुख्याध्यापिका सौ डहाळे मॅडम सर्व शिक्षक स्टॉप विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते