
अहिल्यानगर : आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एक नवा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. या अंतर्गत पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकानंतर हा आणखी एक ‘मास्टर स्ट्रोक’ मानला जात आहे. ज्यात श्रीरामपूर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी अमरावती येथील पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भावर यांची श्रीरामपूरच्या नवीन पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्याकडे आता अहिल्यानगर ग्रामीणचा कार्यभार सोपवण्यात आला असून.
अहिल्यानगर शहर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांची बदली शिर्डीचे नवे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. पोलीस खात्यातील या फेरबदलांमुळे जिल्ह्यातील पोलीस दलाला अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या बदलांमागे गुन्हेगारीला पायबंद घालण्याचा आणि कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्याचा उद्देश असल्याचे
आगामी काळात या नवीन नियुक्त्यांमुळे वर अंकुश ठेवण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे