
शिडी पोलीस स्टेशन हददीत दिनांक 03/02/2025 रोजी पहाटे करडोबानगर चौफुली येथे करडोबानगर कडे जाणारे रोडवर साईबाबा संस्थान येथे डयुटीस जात असलेले एका इसमास धारदार चाकूने वार करुन त्याचेकडील रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन त्यास जिवे ठार मारले होते.

तसंच राहाता पोलीस स्टेशन हददीत दिनांक 03/02/2025 रोजीच पहाटे साकुरी शिव रस्ता, साई परिक्रमा बोर्गाजवळ, ता. राहाता, जि अहिल्यानगर येथे साईबाबा संस्थान मधील एक कर्मचारी डयुटीवरुन घरी जात असतांना रस्त्यात आडवुन त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन त्याचेकडील मोवाईल व पैसे बळजबरीने काढून घेऊन त्याचे अंगावर मोटार सायकल घालुन खाली पाहुन मारहाण करुन गंभीर जखमी करुन त्याचेवर लोखंडी चाकुने छातीत, उजवे वरगडीवर भोसकुन व चेहऱ्यावर वार करुन जवर जखमी करुन त्याचा खुन केला होता.
तसेच शिडी पोलीस स्टेशन हददीत दिनांक 03/02/2025 रोजीच पहाटे एक इसम त्यांचे दुचाकीवरुन जात असतांना त्यांना नमुदचे आरोपी यांनी सदर इसमाचे मोटारासायकलला लाथ मारुन खाली पाहुन जिवे मारण्याचे उददेशाने चाकुने पोटात भोसकले व उजवे कानावर व उजवे हाताचे मनगटाजवळ वार करुन खिशातील पैसे व मोबाईल फोन हे हिसकावुन घेवुन पळून गेले होते. सदरवावत शिर्डी व राहाता पोलीस स्टेशन वेथे 2 खुनाचे तसेच तसेच शिडी पोलीस स्टेशन येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे असे एकूण तीन गुन्हे दाखल होते.
सदरचे गुन्हयाचे तपासात सीसीटीकी फुटेज अनुषंगाने आरोपीतांची ओळख पटवुन आरोपी नामे 1) राजु उर्फ शाक्या अशोक माळी वय 35 वर्षे, रा. रा. गणेशवाडी, शिडी, ता राहाता, जि. अहिल्यानगर मुळ पत्ता विठठलवाडी, शिडी, पिंपळवाडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, 2) किरण ज्ञानदेव सदाफुले. वय 26 वर्षे, रा. रा. गणेशवाडी, शिडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, मुळ पत्ता करकुरी रोड, श्रीरामनगर, नुराणी मस्जिद मागे, शिडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांना पोलीसांनी अटक केलेले होते.
सदरचे गुन्हे आरोपी वर नमूद आरोपी यांनी केलेची तपासात कबुली दिलेली होती सदरचे गुन्हयापैकी शिडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 53/2025 मध्ये प्रथम आरोपीतांना अटक केलेनंतर त्यांचे गुन्हयांचे अभिलेख पडताळणी करुन तपास अधिकारी रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक, शिडी पोलीस स्टेशन यांनी आरोपीतांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदयातील कलमांन्वये कारवाई अनुषंगाने प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांना सादर केलेला होता.
सदरवाचत मा विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी त्यास मंजुरी दिलेली होती. मोक्का कायदयातील कलमांचा अंतर्भाव झालेने नमुदचे गुन्हाचा तपास हा शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग, शिर्डी यांचेकडे देण्यात आलेला होता
सदरचे तपासात आरोपीतांची पुन्हा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आरोपीतांकडे सखोल तपास तसेच मोक्का गुन्हयाचे अनुषंगाने तपास केलेला होता. सदरचे आरोपीतांविरुध्द मा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणेकामी प्रस्ताव योग्य त्या मार्फतीने मा. अपर पोलीस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई वांना सादर केला असता सदरचे प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली होती
आरोपीतांविरुध्द शिर्डी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 53/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 126, 238, 309(6), 311, 312, 3(5) सह भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1949 चे कलम 142, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1) (1), 3(2) व 3 (4) प्रमाणे मा. विशेष न्यावालय, राहाता, जि. अहिल्यानगर येथे विहीत मुदतीत दिनांक 02/08/2025 रोजी दोषारोपपत्र मोक्का गुन्हयाचे तपास अधिकारी शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग, शिर्डी यांनी दाखल केलेले आहे.
सदरची कारवाई ही श्री. डॉ. निखिल गुप्ता, मा. अपर पोलीस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्री. दत्तात्रय कराळे, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री वैभव कलुवमें, अपर पोलीस अधीक्षक, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी,
शिर्डी उपविभाग, शिडी (मोक्का गुन्हा तपास अधिकारी), तसेच श्री. रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक, शिडी पोलीस स्टेशन, (तत्कालीन तपास अधिकारी) व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिडी तसेच शिडी पोलीस स्टेशन वेथील पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे